‘कागल-रंकाळा-हुपरी’चे शहरातील एस.टी. थांबे बंद

By admin | Published: December 14, 2014 12:54 AM2014-12-14T00:54:07+5:302014-12-14T00:54:07+5:30

विद्यार्थी-नोकरदारांतून नाराजी : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा निर्णय

ST in city of 'Kagal-Rankala-Hupri' Stop Stopping | ‘कागल-रंकाळा-हुपरी’चे शहरातील एस.टी. थांबे बंद

‘कागल-रंकाळा-हुपरी’चे शहरातील एस.टी. थांबे बंद

Next

कोल्हापूर : रिक्षा युनियनच्यावतीने केलेल्या तक्रारीचे कारण पुढे करून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कागल-रंकाळा व हुपरी-रंकाळा एस.टी. या बससेवेचे शहरातील थांबे (स्टॉप) बंद करण्याचे आदेश राज्य परिवहन महामंडळास दिले आहेत. यामुळे विद्यार्थी व नोकरदारांना याचा फटका बसणार आहे. या निर्णयाविरुद्ध विद्यार्थी व नोकरदारांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील रिक्षास्टॉपवर कागल-रंकाळा व हुपरी-रंकाळा या एस. टी. थांबतात; यामुळे रिक्षा व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांच्या तक्रारीनुसार व शहरांतर्गत वाहतूक करण्याचा अधिकार फक्त के. एम. टी.ला आहे, अशी कारणे पुढे करून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने सोमवार (दि. १५) पासून राज्य परिवहन महामंडळाच्या कागल-रंकाळा व हुपरी-रंकाळा या एस.टी.चे शहरांंतर्गत थांबे बंद करण्याबाबत पत्र दिले आहे.
मात्र सोमवारपासून जरी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कागल-रंकाळा व हुपरी-रंकाळा या गाडीचे शहरांतर्गत थांबे बंद करण्याबाबत सूचना दिल्या असल्या तरी काही चालकांनी आज, शनिवारी शहरातील थांबे न घेता गाड्या तशाच पुढे नेल्याने काही ठिकाणी वादाचे प्रसंग झाले, तर गोखले कॉलेज येथे काही विद्यार्थ्यांनी कागल-रंकाळा बस अडविण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)

Web Title: ST in city of 'Kagal-Rankala-Hupri' Stop Stopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.