विशेष मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यात १५ हजार नवमतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:51 PM2019-03-08T12:51:04+5:302019-03-08T12:56:17+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. मतदारांचा टक्का कसा वाढेल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नवमतदार नोंदणीसाठी २३ व २४ फेब्रुवारी आणि २ व ३ मार्चला जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मोहीम घेण्यात आली.

 In special campaign, Kolhapur district has 15 thousand newcomers | विशेष मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यात १५ हजार नवमतदार वाढले

विशेष मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यात १५ हजार नवमतदार वाढले

Next
ठळक मुद्देविशेष मोहिमेत १५ हजार नवमतदार वाढलेपंधरा दिवसांत नावे मतदार यादीत समाविष्ट होणार

प्रवीण देसाई

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. मतदारांचा टक्का कसा वाढेल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नवमतदार नोंदणीसाठी २३ व २४ फेब्रुवारी आणि २ व ३ मार्चला जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष मोहीम घेण्यात आली.

यामध्ये १५ हजार ७२६ अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले आहेत. यामुळे सरासरी १५ हजार नवमतदार वाढणार असून, येत्या १५ दिवसांत ही नावे मतदारयादीत समाविष्ट होणार आहेत.

जास्तीत जास्त मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता यावे; यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

डिसेंबरअखेर झालेल्या नोंदणीमध्ये जवळपास सव्वालाख मतदार वाढले. यामुळे जिल्ह्याची मतदारसंख्या ३० लाख ७५ हजारांवर पोहोचली. ३१ जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदारयादीचा हा आकडा आहे. त्यानंतरही आयोगाच्या निर्देशानुसार निरंतर मतदार नोंदणी विशेष मोहीम सुरू करण्यात आली.

यात नाव नोंदणीसह, नावातील दुरुस्ती, स्थलांतर, वगळणी असे विविध अर्ज भरून घेण्यात आले. २३ व २४ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या मोहिमेत ९०६६ इतके मतदार नोंदणीचे अर्ज प्राप्त झाले. यामध्ये महिलांचे ४४७१ व पुरुषांच्या ४५९५ अर्जांचा समावेश आहे. तसेच नावे वगळणीचे २६७१, नावातील दुरुस्तीचे १३४५, तसेच स्थलांतरचे ३९० अर्ज प्राप्त झाले.

त्याचबरोबर २ व ३ मार्चला घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ६६६० मतदार नोंदणीचे अर्ज प्राप्त झाले. यामध्ये महिलांचे ३३७९ व पुरुषांचे ३२८१ अर्ज आहेत. तर नाव वगळणीचे २८७०, नावातील दुरुस्तीचे १२७२ व स्थलांतराचे १५२ अर्ज प्राप्त झाले.

जिल्हा निवडणूक विभागाकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून त्याचे पुरावे तपासून मतदारयादीत ही नावे समाविष्ट केली जाणार आहेत. या प्रक्रियेसाठी १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.

मोहिमेतील संभाव्य वाढलेले मतदार

विधानसभा मतदारसंघ           पुरुष मतदार          महिला मतदार

  • चंदगड                                       ५०१                         ५२४
  • राधानगरी                                  ३९३                         ४४३
  • कागल                                        ८३८                        ९१३
  • कोल्हापूर दक्षिण                      १३३३                      १२८८
  • करवीर                                     ११०५                       १०१५
  • कोल्हापूर उत्तर                          ८३४                         ८९१
  • शाहूवाडी                                      ५९३                        ५०९
  • हातकणंगले                                 ७९४                        ८३४
  • इचलकरंजी                                  ६६९                       ७३४
  • शिरोळ                                         ८१६                       ६९९


जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेतील मतदार नोंदणीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची शहानिशा करून यातील नावे मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत.
- सतीश धुमाळ,
उपजिल्हा निवडणूक अधिकारी
 

 

Web Title:  In special campaign, Kolhapur district has 15 thousand newcomers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.