काही जणांकडेच ‘सामाजिक न्याय’चा निधी : चंद्रकांत पाटील

By admin | Published: May 24, 2017 02:31 PM2017-05-24T14:31:03+5:302017-05-24T16:06:49+5:30

शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक प्रदान, समाजउत्थान पुरस्कारांचे कोल्हापूरात वितरण

Some funded for social justice: Chandrakant Patil | काही जणांकडेच ‘सामाजिक न्याय’चा निधी : चंद्रकांत पाटील

काही जणांकडेच ‘सामाजिक न्याय’चा निधी : चंद्रकांत पाटील

Next

आॅनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 24 - ‘सामाजिक न्याय’विभागाला घटनेच्या आधारे मोठा निधी मिळतो. तो सर्वसामान्यांपर्यंत जावा अशी अपेक्षा आहे. मात्र तो काहीजणांकडेच फिरतोय. म्हणूनच ज्यांनी योजनांचा याआधी लाभ घेतला आहे त्यांनी इतरांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजउत्थान पुरस्कारांचे वितरण बुधवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राज्यातील सहा संस्थांना आणि १२५ जणांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

मंत्री पाटील म्हणाले, समाजातील स्थिती पाहता आम्ही जेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत होतो तेव्हा आमच्या हयातीत परिवर्तन होईल असे वाटत नव्हते. मात्र आता चांगली नोकरी, लठ्ठ पगार सोडून अनेकजण इतरांच्या विकासासाठी काम करताना दिसत आहे. अनेक व्यक्ति आणि संस्था त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत. त्यामुळे आशावादी चित्र निर्माण झाले आहे.

हातकणंगले तालुक्यातील माणगाव परिषदेत शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते असल्याचे जाहीर केले. तेथे स्मारक उभारण्यात येत असून सध्या मंजूर झालेले दोन कोटी रूपये खर्च झाल्यानंतर पुन्हा निधी देऊ.

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, जातीव्यवस्था नष्ट व्हावी यासाठी शाहू, फुले, आंबडेकर यांनी प्रयत्न केले. हाच विकासाच्या विचाराचा धागा पकडून सामाजिक न्याय विभागाच्यावतीने काम सुरू आहे. आंबेडकरांनी वास्तव्य केलेले लंडनमधील घर असो, इंदू मिलचे स्मारक असो ही कामे मार्गी लावली असतानाच आंबेडकरांचे जेथे जेथे वास्तव्य होते ती ठिकाणे विकसित करण्याचे धोरण आमच्या विभागाने आखले आहे.

सामाजिक न्याय खात्याचे राजयमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, गेल्या दोन अडीच वर्षामध्ये राजयातील दीन, दलित, शोषित, पीडीत समाजाला न्याय देण्याचे काम आमच्या विभागातर्फे सुरू आहे. पूर्वी कमी संख्येने विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जावेत म्हणून त््यांना शिष्यवृत्ती दिली जात होती. मात्र आम्ही किमान १२५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या वर्षी ७५ मुले मुली शिक्षणासाठी परदेशात गेली. आजच्या पुरस्कार विजेत्यांनी समाज आणि शासन यांच्यामधील दुवा व्हावे.

या विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. तर समाजकल्याण आयुक्तक पियूष सिंह यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महापौर हसीना फरास, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर, माजी राजयमंत्री भरमूआण्णा पाटील, उत्तम कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त आयुक्तक सदानंद पाटील, प्रादेशिक उपायुक्त रविंद्र कदम पाटील, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, विशेष अधिकारी विशाल लोंढे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्त्यांनी ‘आई बाबां’ची भूमिका स्वीकारावी

नेमक्या भाषेत मांडणी करताना चंद्रकांतदादा म्हणाले, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आता ‘आई बाबां’ ची भूमिका स्वीकारावी. आई जया पध्दतीने कणव बाळगते. त्या भूमिकेतून आपल्या हातातील योजना गरजंूपर्यंत पोहोचलीच पाहिजे असा ध्यास कर्मचाऱ्यांनी घेतला पाहिजे. तर वडील जया पध्दतीने कठोर होतात तसे गैरप्रकार करणाऱ्यांंसाठी काठीही हातात घेतली पाहिजे.

एकदा फायदा घेतल्यानंतर दुसऱ्यासाठी प्रयत्न करा

माझे नीट चालले आहे, तर मी पुन्हा आरक्षणाचा लाभ घेणार नाही, माझी पत्नी सरकारी नोकर आहे तर मग मी पुन्हा घरकुलाच्या योजनेत नाव देणार नाही अशा पध्दतीने जयांनी या योजनांचा लाभ घेतला आहे त्यांनी आता पुन्हा पुन्हा आपण लाभ न घेता तो इतरांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. लाभ घेणारी माणसे बाजुला झाल्यानंतरच खालच्या माणसांना लाभ होणार आहे याची जाणीव ठेवा अशा शब्दात मंत्री पाटील यांनी कार्यकर्त्याना आवाहन केले.

बालकलाकारांना दादांकडून रोख बक्षिस

कार्यक्रम सुरू होण्याआधी रेहमान शकील नदाफ (कोल्हापूर) याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रभावी भाषण केले तर सांगलीच्या पृथ्वीराज गंधर्व याच्या महाराष्ट्र गीताने अंगावर रोमांच उभे केले. या दोघांनाही चंद्रकांतदादा पाटील यांनी वैयक्तिकरित्या रोख बक्षिस दिले. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये उपस्थितांनीही या दोघांच्या सादरीकरणाला दाद दिली.

Web Title: Some funded for social justice: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.