कोल्हापूरच्या वरद गिरी यांच्या चमूने शोधून काढली सापाची नवी प्रजाती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 12:42 AM2019-05-13T00:42:49+5:302019-05-13T00:43:16+5:30

ईशान्य भारतातील मिझोराम येथे सापाची नवी पोटजात आणि प्रजाती संशोधक (उभयसृपशास्त्रज्ञ) डॉ. वरद गिरी आणि त्यांच्या चमूने शोधली आहे. ‘स्मिथोफिस’ असे या सापाचे नामकरण करण्यात आले आहे.

Snake's new species, discovered by the team of Varad Giri of Kolhapur | कोल्हापूरच्या वरद गिरी यांच्या चमूने शोधून काढली सापाची नवी प्रजाती

कोल्हापूरच्या वरद गिरी यांच्या चमूने शोधून काढली सापाची नवी प्रजाती

Next

- संदीप आडनाईक

कोल्हापूर : ईशान्य भारतातील मिझोराम येथे सापाची नवी पोटजात आणि प्रजाती संशोधक (उभयसृपशास्त्रज्ञ) डॉ. वरद गिरी आणि त्यांच्या चमूने शोधली आहे. ‘स्मिथोफिस’ असे या सापाचे नामकरण करण्यात आले आहे.
‘रबडॉप्स’ या पोटजातीमध्ये आजवर केवळ दोन सापांच्या प्रजातींचा समावेश होत होता. यामध्ये पश्चिम घाटातील ‘आॅलिव्ह फॉरेस्ट स्नेक’ म्हणजेच ‘रबडॉप्स आॅलिव्हसिऊस’ आणि ईशान्य भारतातील ‘बायकलर्ड फॉरेस्ट स्नेक’ म्हणजेच ‘रबडॉप्स बायकलर’ यांचा समावेश होता. या दोन्ही प्रजाती या दोन क्षेत्रांमध्येच आढळून येतात. शास्त्रज्ञांनी या दोन्ही प्रजातींच्या गुणसूत्रांची (डीएनए) चाचणी केल्यानंतर त्यांनी या प्रजाती एकाच पोटजातीत मोडत नसल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. या नवीन प्रजातीत ‘टेम्पोरेल स्केल' नसल्याने तिचे नाव ‘स्मिथोफिस अटेम्पोरॅलिसिस’ ठेवले आहे. डॉ. वरद गिरी यांनी लिहिलेला हा शोधप्रबंध ९ मे रोजी ‘झूटॅक्सा’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.

असा आहे स्मिथोफिस
‘स्मिथोफिस अटेम्पोरॅलिसिस’ असे शास्त्रीय नाव असलेल्या या सापाच्या नव्या प्रजातीला ‘मिझो रेन स्नेक’ असे म्हणतात. पावसाळ्यातच आढळणारा हा साप पाण्यात राहतो. पाली, बेडूक, अंडी खाणारा हा साप बिनविषारी आहे. माल्कम ए. स्मिथ यांनी १९३१ पासून १९४३ पर्यंत भारतीय उभयसृप क्षेत्रात केलेल्या कामाचा सन्मान म्हणून या पोटजातीचे नाव ‘स्मिथोफिस’ ठेवले आहे. स्मिथ यांची या विषयावरील तीन पुस्तके ‘फौना आॅफ ब्रिटिश इंडिया’ मालिकेत प्रसिद्ध झाली आहेत.

संशोधकांचे सात वर्षांचे परिश्रम
वर्गीकरणाचे काम गेली सात वर्षे सुरू आहे. पुण्यातील फौंडेशन फॉर बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन या संस्थेचे डॉ. वरद गिरी यांच्यासोबत लंडनच्या 'नॅचरल हिस्ट्री म्युझियम'चे डॉ. डेव्हिड गोवर, ‘वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया’चे डॉ. अभिजित दास, मिझोराम विद्यापीठाचे एच. टी. लालरेमसांगा, ऐझवालच्या पाचुन्गा युनिव्हर्सिटी कॉलेजचे डॉ. सॅम्युएल लालरोंगा, बंगलोरच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स'चे डॉ. व्ही. दीपक यांनी संशोधन केले़

कोण आहेत डॉ. वरद गिरी
राजगोळी गावात वरद गिरी यांचा जन्म झाला आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून प्राणीशास्त्र व कीटक विज्ञानातून पदवी घेतली आहे. सध्या पुण्यातील फौंडेशन फॉर बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन या संस्थेत कार्यरत आहेत.

‘बायकलर’ ही इंडोचायना प्रजातींजवळ जाणारी प्रजात आहे; तर ‘आॅलिव्हसिऊस’ ही त्याहून वेगळी प्रजात आहे. ‘स्केल्स’चे निरीक्षण केल्यानंतर ईशान्य भारतातील ‘बायकलर’ ही प्रजात नव्या पोटजातीत समाविष्ट केली आहे.
- डॉ. वरद गिरी, संशोधक

Web Title: Snake's new species, discovered by the team of Varad Giri of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.