सहा वर्षाच्या सावत्र मुलीवर बापाकडून अत्याचार

By admin | Published: July 3, 2017 04:53 PM2017-07-03T16:53:49+5:302017-07-03T16:56:17+5:30

कोल्हापूरातील खळबळजनक घटना : नराधम कागलचा

The six-year-old girl was tortured by the father | सहा वर्षाच्या सावत्र मुलीवर बापाकडून अत्याचार

सहा वर्षाच्या सावत्र मुलीवर बापाकडून अत्याचार

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. 0३ : ताराबाई पार्क येथील घरी कोणी नसल्याचे पाहून सहा वर्षाच्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधम बापावर रविवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित लिहाज लियाकत मुजावर (वय २९, रा. रोटे गल्ली, निपाणी वेस, कागल, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. संशयित आरोपी हा एका वजनदार राजकीय नेत्याचा जवळचा नातेवाईक असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पिडीत मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे, माझे २०११ मध्ये पहिले लग्न मुंबई येथील जावेद काझी या युवकाशी झाले. त्यांचेपासून मुलगी झाली. त्यानंतर कौटूंबिक वादातून दोघांच्यात घटस्फोट झाला. मुलगी माझ्यासोबत राहते. त्यानंतर २०१४ मध्ये लिहाज मुजावर याचेसोबत दूसरे लग्न झाले. त्यानंतर मी, मुलगी व पती लिहाज माझ्या आई-वडीलांच्या ताराबाई पार्क येथील घरी राहू लागलो.

लिहाज हा कामधंदा करीत नसल्याने माझ्या वडीलांनी त्याला व्यवसायासाठी पंचवीस लाख रुपये दिले. परंतू त्याने ते चैनीसाठी खर्च केले. त्यानंतर त्याचेपासून मला मुलगा झाला. माझ्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलीला तो सतत शिवीगाळ करीत असे. आठ महिन्यापूर्वी पती लिहाज घराबाहेर गेला असता मुलगी माझ्याजवळ येवून रडू लागली. तिला विश्वासात घेवून विचारपूस केली असता तिने वडील लिहाज हे लैंगिक अत्याचार करीत असल्याचे सांगितले. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. हे ऐकून मला मानसिक धक्काच बसला. माझ्या आईनेही त्याला रंगेहात पकडले. त्यानंतर तो घरातून पळून गेला. या धक्क्याने माझ्या वडीलांचे निधन झाले. मी दूसऱ्यांदा त्याच्यापासून गरोदर राहिल्याने डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मी बरी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेवून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून मोहिते यांनी महिला दक्षता विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका शेळके यांना चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. शेळके यांनी माझ्या मुलीकडे चौकशी केली असता तिने स्वत:वर घडलेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तत्काळ शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक प्रविण चौगुले यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

माझ्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी लिहाज मुलावर याचेवर बलात्कार, बाललैंगिक अत्याचाराखाली गुन्हा दाखल केला आहे. संशयित हा एका राजकीय वजनदार नेत्याचा जवळचा नातेवाईक आहे. त्याने गुन्हा दाखल होवू नये, यासाठी पोलीसांवरही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतू कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक मोहिते यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख करीत आहेत.

फिर्याद मागे घेण्यासाठी दबाव

पोलीसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी संशयित आरोपी लिहाज मुजावर याने पिडीत मुलीच्या आईवर राजकीय व गुन्हेगारी लोकांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी मुलीसह दोघांनाही ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: The six-year-old girl was tortured by the father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.