निपाणीजवळ भीषण अपघात, मुरगुडच्या जमादार कुटूंबासह सहाजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 06:23 PM2019-01-05T18:23:47+5:302019-01-05T19:24:50+5:30

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीजवळील तवंदी घाटात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि कारच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात ट्रकचालक, बालक आणि महिलेसह सहाजण ठार झाले.

Six dead in Jupiter's Jumma family killed in the accident | निपाणीजवळ भीषण अपघात, मुरगुडच्या जमादार कुटूंबासह सहाजण ठार

निपाणीजवळ भीषण अपघात, मुरगुडच्या जमादार कुटूंबासह सहाजण ठार

Next
ठळक मुद्देनिपाणीजवळ भीषण अपघातमुरगुडच्या जमादार कुटूंबातील सहाजण ठार

निपाणी/कोल्हापूर : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीजवळील तवंदी घाटात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि कारच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात बालक आणि महिलेसह सहाजण ठार झाले.



कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड येथील जमादार कुटूंबिय बेळगावकडे निघाले होते. तवंदी घाटात पायथ्याशी असलेल्या अमर हॉटेलजवळ सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास फरशी वाहतूक करणाऱ्या ट्रकने जमादार कुटूंबिय असलेल्या कारला समोरुन जोरदार धडक दिली. सोशल मीडियावरून मिळालेल्या या बातमीने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.अपघात इतका भीषण आहे की मृतदेहांची ओळख पटवणे मुश्किल बनले आहे.


    याबाबत अधिक माहिती अशी मुरगुड ता.कागल येथील डॉक्टर मोहसीन दिलावर जमादार हे आपला भाऊ जुनेद दिलावर जमादार याच्या मुलगी च्या बारशासाठी बेळगाव येथे आपल्या संपूर्ण कुटुंबा सोबत स्वतःच्या वॅगन आर गाडीतून जात होते. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी,त्यांचा सहा वर्षाचा मुलगा तसेच त्यांचे आई वडील व भाऊ जुनेद जमादार गाडीमध्ये होते.

दुपारी चारच्या सुमारास तवंदी घाटात बेळगाव कडून निपाणीकडे येणाऱ्या फरशी वाहतूक करणाऱ्या ट्रक उलट दिशेला कठडा तोडून जमादार यांच्या गाडीवर आदळला.त्यानंतर सुमारे 200 फूट गाडी ट्रक बरोबर फरफट गेल्याने गाडीचा चक्काचूरा झाला आहे.तर गाडीतील सर्वांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात इतका भीषण होता की कोणाचाच मृतदेह ओळखत नाही.गाडीच्या बाहेर सापडलेल्या ओळख पत्रावरून या कुटुंबाची ओळख पटली.या अपघाताची निपाणी पोलीस स्टेशन मध्ये नोंद झाली आहे.

ही धडक इतकी जोरदार होती की ट्रकने या कारला 200 फूट अंतर फरफटत नेले. चार पुरुष, एक महिला आणि एक बालक असे या कारमध्ये होते. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. अपघातात ट्रकचालकही ठार झाला आहे. 



हा अपघात इतका भीषण होता, की कारचा चक्काचूर झाला होता. घटनास्थळावर बेळगाव पोलिस दाखल झाले असून बेळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक सुधीरकुमार रेड्डी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. निपाणी येथील शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पूंज लॉईडचे कर्मचारी दाखल झाले आहे. 

Web Title: Six dead in Jupiter's Jumma family killed in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.