पन्हाळा येथे शिवपदस्पर्श दिन, तीन दरवाजा पणत्यांनी उजळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 17:53 IST2017-11-30T17:41:35+5:302017-11-30T17:53:34+5:30
छत्रपती शिवरांयानी अफजलखानाच्या वधानंतर अठराव्या दिवशी म्हणजेच २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळागड ताब्यात घेतला, सर्व पन्हाळगड मशालीच्या उजेडात रात्रीच्यावेळेत त्यांनी पाहिला.या इतिहासाला उजाळा देत याची आठवण कोल्हापुरल जिल्ह्यातील शिवभक्तांनी २८ नोव्हेंबर हा ३५९ वा शिवपदस्पर्श दिन म्हणुन उत्साहात साजरा केला.

पन्हाळा येथे शिवपदस्पर्श दिन, तीन दरवाजा पणत्यांनी उजळला
पन्हाळा : छत्रपती शिवरांयानी अफजलखानाच्या वधानंतर अठराव्या दिवशी म्हणजेच २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळागड ताब्यात घेतला व सर्व पन्हाळगड मशालीच्या उजेडात रात्रीच्या वेळेत त्यांनी पाहिला. या इतिहासाला उजाळा देत याची आठवण कोल्हापुरल जिल्ह्यातील शिवभक्तांनी २८ नोव्हेंबर हा ३५९ वा शिवपदस्पर्श दिन म्हणुन उत्साहात साजरा केला.
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर ३५९ वर्षापुर्वी प्रथमच तीन दरवाजा मार्गे गडावर दाखल झाले होते. त्यामुळे या दिनाऔचित्य साधत गडावरील तीन दरवाजा व परिसरात सुमारे तीन हजार पणत्या लावण्यात आल्याने तीन दरवाजा परिसर झगमगुन शिवरायांच्या आठवणींना उजाळा देत गेला.
यावेळी या शिवभक्तांनी जय शिवाजी,जय भवानी.छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी पन्हाळगड शिवमय बनले होते.तीन दरवाजा येथे इतिहास संशोधक इद्रजित सावंत यांनी शिवभक्तांना मार्गदर्शन केले.
यावेळी शिवप्रसाद शेवाऴे, हर्षल सुर्वे, अमोल बुचडे, पवन पवार, प्रविण शिंदे, प्रथमेश पाटील, सुजय शिंदे या इतिहास प्रेमी उपस्थित होते.सायंकाळी ठिक पाच वाजता या पणत्या लावण्यास सुरुवात झाली त्यानुसार तीन दरवाजा येथे या पणत्या रात्रभर तेवत होत्या.