शरद पवार जाणार मामाच्या गावाला आठवणींना उजाळा : आजोळी गोळीवडेला १० जानेवारीला देणार भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:45 PM2017-12-27T23:45:55+5:302017-12-27T23:46:19+5:30

कोल्हापूर : मामाचा गाव म्हणजे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार

Sharad Pawar to unveil memories of Mama's village: Goliwade gift gift to Jan 10 | शरद पवार जाणार मामाच्या गावाला आठवणींना उजाळा : आजोळी गोळीवडेला १० जानेवारीला देणार भेट

शरद पवार जाणार मामाच्या गावाला आठवणींना उजाळा : आजोळी गोळीवडेला १० जानेवारीला देणार भेट

Next

कोल्हापूर : मामाचा गाव म्हणजे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. राष्ट्रवादी दी कॉँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे तरी याला कसे अपवाद असतील? म्हणूनच पवार हे १० जानेवारीला पन्हाळा तालुक्यातील गोळीवडे या आपल्या मामाच्या गावाला आवर्जून भेट देणार आहेत.

शरद पवार आणि कोल्हापूर यांच्यामधील नाते सर्वश्रुत आहे. कोल्हापूरकरांवरही पवार कुटुंबीयांनी मनापासून प्रेम केले आणि पवार यांनीही कोल्हापूरच्या विकासासाठी भरभरून दिले. पन्हाळा तालुक्यातील गोळीवडेसारख्या छोट्या गावात भोसले कुटुंबीयांत त्यांच्या आई शारदातार्इंचा जन्म झाला होता.पवार ९ जानेवारीला राजर्षी शाहू महाराजांच्या समाधिस्थळाच्या उद्घाटनासाठी कोल्हापूरच्या दौºयावर येणार आहेत.

यावेळी सकाळी अकरा वाजता लोकनेते सदाशिवराव मंडलिक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणाºया पुरस्कार सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत. दुसºया दिवशी म्हणजे १० जानेवारीला सकाळी ते गोळीवडे येथे भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. तेथून जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या घरीजाणारआहेत.

बाबासाहेब पाटील यांच्या आर्इंचे चार महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे सात्वन करण्यासाठी ते तिथे जाणार आहे.एकंदरीतच, शरद पवार यांच्या या दौºयाने जुन्या आठवणींना उजाळा मिळणार असून, गोळीवडे ग्रामस्थांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होणार आहे.

स्थानिक ग्रामस्थांची इच्छा
शरद पवार व त्यांचे कुटुंबीय कोल्हापुरात आले की त्यांच्या नातेवाइकांना भेट देतात; पण ते आजोळी गोळीवडेला कधी गेले नाहीत. पवार यांनी गोळीवडेला यावे, अशी तेथील ग्रामस्थांची इच्छा आहे. त्यांनी अनेक वेळा पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडे तसा आग्रहही धरला होता; पण व्यस्त कार्यक्रमांमुळे त्यांना आतापर्यंत जाणे शक्य झाले नव्हते.

Web Title: Sharad Pawar to unveil memories of Mama's village: Goliwade gift gift to Jan 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.