कोल्हापुर जिल्ह्यात संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:34 AM2017-09-20T00:34:18+5:302017-09-20T00:36:18+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात गगनबावड्यासह धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. संततधार पावसाने सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ

Santhadhar in Kolhapur district | कोल्हापुर जिल्ह्यात संततधार

कोल्हापुर जिल्ह्यात संततधार

Next
ठळक मुद्देधरणक्षेत्रात अतिवृष्टी : ‘राधानगरी’चे सातही दरवाजे खुले१५ बंधारे पाण्याखाली; ‘भोगावती’ पात्राबाहेरराधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पंचगंगा नदीची पातळी २२ फुटांपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात गगनबावड्यासह धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. संततधार पावसाने सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पंचगंगा नदीची पातळी २२ फुटांपर्यंत पोहोचली असून, १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

मागील आठवड्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस रोज हजेरी लावत होता. तासभर कोसळल्यानंतर दिवसभर कडकडीत ऊन पडत होते; पण गेले तीन-चार दिवस एकसारखा पाऊस सुरू आहे. गगनबावडा तालुक्यात चोवीस तासांत तब्बल १०४.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वच तालुक्यांत व धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत राधानगरीचे क्रमांक ३ व ६ हे दोन दरवाजे खुले होते; पण त्यानंतर पावसाचा जोर वाढत गेल्याने सातही स्वयंचलित दरवाजे खुले झाले. त्यातून प्रतिसेकंद १२ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीचे पाणी पात्राबाहेर पसरले आहे. वारणा धरणातून प्रतिसेकंद १२ हजार ५६७, तर दूधगंगा धरणातून २४५० घटफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील सहा नद्यांवरील १५ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गांवरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यात बारा घरांची पडझड झाल्याने चार लाख पाच हजारांचे नुकसान झाले आहे.

‘पंचगंगे’च्या पातळीत वाढ
मंगळवारी सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी १६ फुटांवर होती; पण सायंकाळी सहा वाजता ती २२ फुटांपर्यंत पोहोचली होती. दिवसभर तब्बल सहा फुटांनी पाण्याची पातळी वाढली.
तालुकानिहाय पाऊस हातकणंगले- ९.१२, शिरोळ- ७.००, पन्हाळा- २६.००, शाहूवाडी- ३०.६७, राधानगरी- ३३.८३, गगनबावडा- १०४.५०, करवीर- १७, कागल- १५.५७, गडहिंग्लज- १६.५७, भुदरगड- २६.००, आजरा- ३६.२५, चंदगड- ३५.५०.

झडीचा पाऊस आणि गारठा!
साधारणत: जुलै महिन्यात झडीचा पाऊस सुरू असतो. संततधार पावसाने हवेत गारठा व कुबट वातावरण असते.असेच वातावरण गेले चार दिवस जिल्ह्यात आहे. हवेत गारठा असल्याने नागरिक घरातून बाहेर पडण्यास टाळत आहे.

Web Title: Santhadhar in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.