समरजितसिंह घाटगेच भाजपचे उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:28 AM2017-08-23T00:28:02+5:302017-08-23T00:28:02+5:30

Samarjit Singh Ghatge BJP candidate | समरजितसिंह घाटगेच भाजपचे उमेदवार

समरजितसिंह घाटगेच भाजपचे उमेदवार

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी कागल तालुक्यातून भरपूर इच्छुक आहेत; पण त्यामुळे समरजितसिंह घाटगे समर्थकांनी विचलित व्हायचे कारण नाही. कारण या तालुक्यात सर्वांत पहिल्यांदा तुम्ही भाजपचा झेडा खांद्यावर घेतला आहात. त्यामुळे पहिल्या रांगेत समरजितसिंहच असतील, बाकीचे नंतर असतील, असे स्पष्ट प्रतिपादन आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी केले.
कागल तालुका भाजप कार्यकारिणीची बैठक आणि पदाधिकारी नियुक्तीची पत्रे वितरण कार्यक्रमात आ. हाळवणकर मंगळवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाबा देसाई होते. समरजितसिंह घाटगे यांच्या झंझावाताने इथल्या राजकीय मंडळींची झोप उडाली आहे. म्हणून ते ‘मैदान सोडून जाऊ नका’ अशी भाषा करीत आहेत, अशी टीकाही आ. हसन मुश्रीफांचे नाव न घेता त्यांनी केली. कागलच्या गटा-तटाच्या राजकारणात आम्हाला स्थान मिळेल काय? याची चिंता होती; पण आज भाजपचे काम दखल घ्यावे असे आहे. मुख्यमंत्र्यांनीही कौतुक केले आहे. आता तालुक्याला हक्काचा कमळ चिन्हाचा ब्रॅण्डेड आमदार मिळेल, असेही ते म्हणाले.
समरजितसिंह घाटगे म्हणाले की, २०१९ ची निवडणूक ही केवळ भाजप आणि समरजितसिंह घाटगेंची नाही, तर ती कागल तालुक्याच्या आत्मसन्मानाची आहे. आमची दिशा योग्य असल्यानेच आमच्यावर टीका होत आहे. यावेळी करणसिंह घाटगे, कर्णसिंह रणनवरे यांनी ठरावांचे वाचन केले. यावेळी तालुकाध्यक्ष परशुराम तावरे, प्रचारक शिवाजी बुवा, विशाल पाटील मळगेकर, आदी उपस्थित होते.
समरजितसिंहच आमदार...
ज्येष्ठ नेते बाबा देसाई म्हणाले, समरजितसिंह घाटगे यांना आमदार करण्याचे आपले सर्वांचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी कामाला लागा. हे सांगण्यासाठी आज मुद्दाम आ. हाळवणकर येथे आले होते. तर परशुराम तावरे म्हणाले की, समरजितसिंह घाटगे हे गरुडाचे पिल्लू आहे. मैदानातून पळ काढणार नाही, तर तुम्हाला कधी उचलून नेले हे कळणार नाही.
स्वर्गीय राजेंच्या स्वप्नपूर्तीसाठीच मैदानात
समरजितसिंह घाटगे म्हणाले की, राजेंनी मला सांगितले होते की, तुम्हाला राजर्षी शाहूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व माझ्या स्वप्नातील कागल घडविण्यासाठी कठोर श्रम करावे लागतील. खूप पचवावे लागेल. नीळकंठ व्हावे लागेल. सगळेच तुमच्या अंगावर येतील. तयारी असेल तर शब्द द्या. मी त्यांना शब्द दिला आहे, म्हणून मैदानात उतरलो आहे.

Web Title: Samarjit Singh Ghatge BJP candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.