रुकडीच्या बेपत्ता कारखानदाराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:12 AM2017-09-25T00:12:10+5:302017-09-25T00:12:10+5:30

Rukdi's disappeared factories murdered | रुकडीच्या बेपत्ता कारखानदाराचा खून

रुकडीच्या बेपत्ता कारखानदाराचा खून

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
हातकणंगले : रुकडी (ता. हातकणंगले) येथील एका कारखानदाराचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना तब्बल २६ दिवसांनी उघडकीस आली. हरिसिंग प्रीतमसिंग रामगडीया (वय ४९) असे खून झालेल्याचे नाव आहे. हा खून त्यांच्या दोन परप्रांतीय कामगारांनी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेह कुजला असल्याने घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. याबाबतचा गुन्हा हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी येथील कोल्हापूर रोडवर हरिसिंग प्रीतमसिंग रामगडीया हे पत्नी सविता आणि सातवर्षीय हरज्योतसह राहत होते. ते मूळचे सोनीपत, दिल्ली येथील होत. बºयाच वर्षांपासून ते इचलकरंजी येथे राहत होते. त्यांचा ब्रेकलायनिंग तयार करणे आणि स्पेअरपार्टचा व्यवसाय इचलकरंजी आणि रुकडी येथील नदीरोडवरील गंजीमाळ परिसरात होता. रुकडी येथे त्यांनी सात वर्षांपूर्वी घर घेतले होते. त्यांच्याकडे काही महिन्यांपासून उत्तर प्रदेशमधील आझमगड इथले भूपेंदर आणि हरविंदर हे कामगार काम करीत होते. ३० आॅगस्टपासून हरिसिंग बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाइकांनी हातकणंगले पोलिसांत केली होती. हे दोन्हीही कामगार बेपत्ता झाले होते. नातेवाईकांनी शोध घेतला पण ते सापडून आले नाहीत. रविवारी सकाळी नातेवाईकांनी रुकडी इथल्या कारखान्याची स्वच्छता सुरू केली होती. यावेळी दुर्गंधी सुटल्याने त्यांनी सामाजिक कार्यकर्ते शीतल खोत आणि पोलीसपाटील कविता कांबळे यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी तत्काळ हातकणंगले पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सी. बी. भालके कर्मचाºयांसह दाखल झाले. कारखान्याच्या पाठीमागे असणाºया सिमेंट काँक्रीटच्या पाण्याच्या टाकीत पोत्यात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. मारेकºयांनी चाकू आणि कोयत्याच्या साह्याने डोक्यावर, मानेवर आणि हातावर वार करून खून केल्याच्या जखमा आहेत. गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही कामगारांचा पगार हरिसिंग यांनी दिला नसल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होता. त्यातूनच ही घटना घडली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे यांनी भेट दिली. घटनास्थळी नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.

Web Title: Rukdi's disappeared factories murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.