शेतकरी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी हीच विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:40 AM2019-04-25T00:40:41+5:302019-04-25T00:40:45+5:30

कोल्हापूर : मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. त्यामुळे शेतकरी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी हीच माझ्यासाठी विश्रांती आहे. शेतकऱ्यांचे चेहरे आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळातून ...

The rest of the farmer, the workers, the same rest | शेतकरी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी हीच विश्रांती

शेतकरी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी हीच विश्रांती

Next

कोल्हापूर : मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. त्यामुळे शेतकरी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी हीच माझ्यासाठी विश्रांती आहे. शेतकऱ्यांचे चेहरे आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळातून मला अविरतपणे काम करण्याची ऊर्जा मिळते. आता लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये महाआघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन दिवसांत जाणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगितले.
ते म्हणाले, गेल्या महिन्याभरापासून निवडणुकीच्या रणधुमाळीत दिवस कसा जायचा हेच समजत नव्हते. मागील १५ दिवसांत रोज तीन ते चार तासच झोप मिळायची. रोज पहाटे पाच वाजता माझा दिवस सुरू होतो. मंगळवारी मतदान झाल्यानंतर निवांत झालो. बुधवारी सकाळी साडेसात वाजता उठलो. घरी भेटण्यासाठी कार्यकर्ते आले होते. त्यांच्याशी चर्चा करून मतदारसंघातील विवाह, तसेच अन्य समारंभांसाठी उपस्थिती लावली.
दिवसभर पट्टणकोडोली, इस्लामपूर, आदी गावांतील शेतकरी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांचे आभार मानले. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील विविध मतदारसंघांतील महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुढील काही दिवस दौरा करणार आहे. विश्रांतीसाठी मी कधीच सुटी घेऊन बाहेर जात नाही. शेतकरी व कार्यकर्त्यांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधण्यातून मला विश्रांती मिळते. ऊसदर आंदोलनावेळी अनेकदा ताणतणाव यायचा. त्याच्या तुलनेत निवडणूक कालावधीतील तणाव कमी होता. संयमाने वाटचाल आणि विरोधकांना सामोरे गेल्याने या तणावाचा परिणाम माझ्यावर झाला नाही.
शेतकऱ्यांचे चेहरे, कार्यकर्त्यांच्या पाठबळातून ऊर्जा
मी संवेदनशील आहे. या निवडणुकीत प्रचारामध्ये विरोधकांकडून जिव्हारी लागणारी टीकाटिप्पणी झाली. त्यावेळी थोडे नैराश्य आणि विरक्तीची भावना मनात यायची. मात्र, त्याचवेळी विविध प्रश्न असलेल्या शेतकºयांचे चेहरे डोळ्यांसमोर यायचे. शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी लढले पाहिजे या विचारामुळे मग नैराश्य, विरक्तीची भावना आपोआप दूर गेली. शेतकºयांचे चेहरे आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळातून ऊर्जा मिळत असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले.

Web Title: The rest of the farmer, the workers, the same rest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.