मंडलिक-सीमावासीयांमधील ऋणानुबंध’ दृढ--मल्टिस्टेटचा नवा आयाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 08:31 PM2017-09-25T20:31:11+5:302017-09-25T20:32:11+5:30

म्हाकवे : दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक आणि सीमावासीयांचे गेल्या दोन दशकांपासून अगदी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत; परंतु मंडलिकांच्या पश्चात हे बंध तुटतात की काय, अशी शंका होती

Relations between Mandalik-Srila residents' new dimension of strong-multiteste | मंडलिक-सीमावासीयांमधील ऋणानुबंध’ दृढ--मल्टिस्टेटचा नवा आयाम

मंडलिक-सीमावासीयांमधील ऋणानुबंध’ दृढ--मल्टिस्टेटचा नवा आयाम

Next
ठळक मुद्देसीमाभागातील १४ गावांना लाभ; स्वप्न पूर्ण होणार असल्याने नवचैतन्यराज्यात ऐतिहासिक ठरलेल्या २००९ च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नेतेमंडळी मंडलिकांच्या विरोधात होती.

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हाकवे : दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक आणि सीमावासीयांचे गेल्या दोन दशकांपासून अगदी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत; परंतु मंडलिकांच्या पश्चात हे बंध तुटतात की काय, अशी शंका होती. मात्र, प्रा. संजय मंडलिक यांच्यासह मंडलिकप्रेमी कार्यकर्त्यांनी मंडलिक कारखाना बहुराज्य (मल्टिस्टेट) करून सीमावासीयांनाही सभासदत्वासह या कारखान्याचे मालकत्व देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. यामुळे मंडलिक आणि सीमावासीयांमधील ऋणानुबंध आणखी दृढ होणार आहेत. तसेच गेल्या दशकापासून या कारखान्याच्या सभासदत्वाची आस लागलेल्या सीमावासीयांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

सीमावासीय आपले मतदार नाहीत, याची कल्पना असतानाही केवळ मानवता धर्म पाळत दिवंगत लोकनेते मंडलिक सीमावासीयांच्या मदतीला धावून गेले. शेतीसाठी आवश्यक असणारी पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविली. त्यामुळे गेल्या दोन दशकांपासून मंडलिक आणि सीमावासीयांचे ऋणानुबंध घट्ट जोडले गेले. मतदान करू शकत नसले तरी त्यांनी मंडलिकांची नेहमीच पाठराखण केली.

१९९५ मध्ये सदाशिवराव मंडलिक यांनी पाटबंधारे राज्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच काळम्मावाडी धरणातील पाणी वाटपाचा योग्य असा निर्णय घेण्याचा चंग बांधला. जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेऊन म्हाकवेहून पूर्वेकडे सीमाभागात जाणाºया आणि शेंडूर, करनूरकडील कच्च्या कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. तसेच ऐन जानेवारीपासून कोरड्या पडणाºया वेदगंगा नदीत आदमापूरच्या ओढ्यातून पाणी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, कच्च्या कालव्यातून आणि ओढ्यातून पाणी सोडणे धोकादायक आणि नियमबाह्य असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. मात्र, होणाºया सर्व परिणामाला आणि जोखमीला आपण स्वत: जबाबदार असल्याचे सांगत मंडलिकांनी आपलाच शब्द खरा केला. त्यांच्या निर्णयाने सीमाभाग पाणीदार बनला.

त्याचबरोबर राज्यात ऐतिहासिक ठरलेल्या २००९ च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नेतेमंडळी मंडलिकांच्या विरोधात होती. यावेळीही सीमावासीयांनी मतपेटीतून पाठबळ देणे अशक्य असले तरी लोकवर्गणी जमा करून म्हाकवे (ता. कागल) येथील प्रचारसभेत आर्थिक पाठबळ दिले होते. यामुळे मंडलिक आणि सीमावासीयांमध्ये अगदी जिव्हाळ्याचे संंबंध होते. अगदी मंडलिक यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी सीमावासीयांनी कारखाना कार्यस्थळावर उपस्थिती लावली होती.
दरम्यान, मंडलिकांच्या निधनानंतर हे भावबंध तुटले जातील की काय, अशी शंका वाटत होती. मात्र, मंडलिक कारखाना बहुराज्यीय करण्याच्या निर्णयामुळे हे ऋणानुबंध पूर्वीइतकेच दृढ होतील यात तीळमात्र शंका नाही.

...तर सीमाभागात कागल इतकेच सभासद
कागल तालुक्यामध्ये राजकारणासह साखर कारखानदारांमध्ये ऊसदराची नेहमी चढाओढ असते. तसेच शेतकºयांना विविध योजना पुरविण्यातही स्पर्धा सुरू आहे. याचे मोठे आकर्षण सीमावासीयांना आहे. त्यामुळे येथील कारखान्यात सभासद होण्यासाठी येथील शेतकरी नेहमीच उत्सुक असतात.

मंडलिक कारखान्याने तर उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवत सभासदांना विविध योजनांचा लाभ दिला आहे. त्यामुळे मल्टिस्टेटचा कायदेशीर मार्ग मोकळा होताच कागलच्या बरोबरीने सीमाभागातील सभासद होतील, असे जाणकारांचे मत आहे.
 

 

केवळ साखर निर्मितीपुरते मर्यादित न राहता कारखाना कार्यस्थळावर शिक्षण, आरोग्य सुविधा, माती परीक्षण, प्रयोगशाळा, आदी सर्व सुविधा देऊन हा कारखाना कल्पवृक्ष व्हावा, तसेच मंडलिक साहेबांच्या स्वप्नातील कारखाना बनविण्यासाठी या कारखान्याची बहुराज्य नोंदणी करून घेऊ.
- प्रा. संजय मंडलिक, अध्यक्ष, ‘सदा’साखर, हमीदवाडा


‘दिवंगत मंडलिक आणि सीमावासीयांचे अतूट नाते आहे. त्यांनी स्थापन केलेल्या मंडलिक कारखान्यामध्ये सभासद होण्यासाठी सीमावासीय आतूर आहेत. बहुराज्यीय कायद्याखाली या कारखान्याची नोंदणी त्वरित होऊन आम्हाला सभासद होण्याची संधी लवकर उपलब्ध व्हावी.’
- अमर शिंत्रे (कुर्ली) व शिवाजी साखरे (हदनाळ, ता. चिक्कोडी)

Web Title: Relations between Mandalik-Srila residents' new dimension of strong-multiteste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.