रब्बीच्या क्षेत्रात दोन लाख हेक्टरची घट: सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:29 PM2017-12-06T23:29:55+5:302017-12-06T23:34:57+5:30

कोल्हापूर : रब्बी धान्याला मिळणारा बेभरवशाचा दर, पाण्याची मुबलक उपलब्धता आणि उसाला मिळत असलेला दर यांचा थेट परिणाम रब्बीच्या क्षेत्रावर झाला आहे.

 Rabi fall in two lakh hectare: Pictures of Satara, Sangli and Kolhapur districts | रब्बीच्या क्षेत्रात दोन लाख हेक्टरची घट: सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील चित्र

रब्बीच्या क्षेत्रात दोन लाख हेक्टरची घट: सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील चित्र

Next
ठळक मुद्देऊसदरामुळे शेतकºयांची मानसिकता बदलली कोल्हापूर विभागात गतवर्षीपेक्षा पावणेदोन लाख हेक्टर पेरक्षेत्र घटले सातारा जिल्ह्यांतील पेरक्षेत्र सर्वाधिक कमी ज्वारीला निश्चित भाव नसल्याने आपल्यापुरते उत्पादन घेणे, एवढीच शेतकºयांची मानसिकता

राजाराम लोंढे ।
कोल्हापूर : रब्बी धान्याला मिळणारा बेभरवशाचा दर, पाण्याची मुबलक उपलब्धता आणि उसाला मिळत असलेला दर यांचा थेट परिणाम रब्बीच्या क्षेत्रावर झाला आहे. कोल्हापूर विभागात गतवर्षीपेक्षा पावणेदोन लाख हेक्टर पेरक्षेत्र घटले आहे. सातारा जिल्ह्यांतील पेरक्षेत्र सर्वाधिक कमी झाले असून, आतापर्यंत केवळ सव्वा लाख हेक्टरवरच पेरणी पूर्ण झाली आहे.

कोल्हापूर विभागात खरिपाचे क्षेत्र जास्त असले तरी रब्बीचेही कमी नाही. विभागात ५ लाख २४ हजार ७५० हेक्टर रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. यातील सांगली जिल्ह्यांत सर्वाधिक २ लाख ६६ हजार, तर सातारा जिल्ह्यात २ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यांत खरिपाच्या तुलनेत २५ टक्केही रब्बीचे क्षेत्र नाही. सांगली जिल्ह्यातील बहुतांश, तर सातारा जिल्ह्यांत माण, खटावसह निम्मे तालुके दुष्काळी असल्याने येथे रब्बीचे क्षेत्र वाढते; पण गेली दोन वर्षे सांगली, सातारा जिल्ह्यांत पाऊस चांगला झाला आहे. सिंचनाखालील क्षेत्र वाढल्याने त्याचा थेट परिणाम रब्बी क्षेत्रावर झाला आहे. रब्बीमध्ये पिकविलेल्या गहू, हरभरा, मका, ज्वारीला निश्चित भाव नसल्याने आपल्यापुरते उत्पादन घेणे, एवढीच शेतकºयांची मानसिकता आहे. त्यात पाण्याची उपलब्धता वाढल्याने रब्बीचे क्षेत्र कमी झाले आहे.

खरिपाची काढणी आॅक्टोबरला संपत असली तरी आपल्याकडे डिसेंबरअखेर रब्बीची पेरणी होते. विभागात ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक आहे; पण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ ६८ टक्केच पेरणी झाली आहे. गव्हाचे क्षेत्र कमालीचे घटले असून, केवळ २६ तर मक्याची ४३ टक्केच पेरणी झाली आहे. हरभºयाची पेरणी ४५ टक्के झाली आहे.

वैरण म्हणूनच ज्वारी, मक्याची पेरणी
पूर्वी उत्पादन घ्यायचे म्हणून बाजारी, ज्वारी, मक्याची पेरणी केली जात असे; पण या उत्पादनांना बाजारात फारसा दर मिळत नसल्याने जनावरांच्या वैरणीसाठीच ही पिके रब्बीमध्ये घेतली जातात.

यामुळे रब्बीत घट
ज्वारी, गहू, हरभºयाचे अस्थिर दर
गेल्या दोन वर्षांत झालेला चांगला पाऊस
वाढलेले सिंचन, उसाचा दर

रब्बीची तुलनात्मक पेरणी

२०१६-१७ २०१७-१८ घट
सातारा १.४७ लाख १.४ लाख ४० हजार
सांगली १.४९ लाख १.८४ लाख ३५ हजार
कोल्हापूर 0.१५ लाख ०.८४ लाख ६.४ हजार

२०१६-१७ २०१७-१८ घट
सातारा ३७,३२५ ७३५३ २९९७२
सांगली २३००० १६००० ७०००
कोल्हापूर ४३४७ ३१० ४०३७

२०१६-१७ २०१७-१८ घट
सातारा १२७७३ ३१६३ ९६१०
सांगली १८५५१ १४५९४ ३९५७
कोल्हापूर ७५९४ ६९१ ६९०३

Web Title:  Rabi fall in two lakh hectare: Pictures of Satara, Sangli and Kolhapur districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.