कोल्हापुरात जागतिक एडस दिनानिमित्त प्रभात फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 04:00 PM2018-12-01T16:00:48+5:302018-12-01T16:02:17+5:30

मागील काही वर्षांच्या तुलनेत नवीन एचआयही संसर्गितांचे प्रमाण कमी होत आहे. २०३० पर्यंत हा आकडा शुन्यावर आणायचा आहे. यासाठी एड्स निर्मुलनाच्या कार्यात शासनाबरोबर समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन आरोग्य उपसंचालक डॉ. पी.पी. धारुरकर यांनी शनिवारी केले.

Prabhat Ferry on the occasion of World AIDS Day in Kolhapur | कोल्हापुरात जागतिक एडस दिनानिमित्त प्रभात फेरी

जागतिक एडस दिनानिमित्त शनिवारी कोल्हापूर जिल्हा एड्स नियंत्रण पथक, सी.पी.आरतर्फे प्रभात फेरीचे हिरवा ध्वज दाखवून सीपीआरमधून उदघाटन झाले. यावेळी डॉ. पी.पी.धारुरकर, डॉ. बी.सी. केम्पीपाटील, दीपा शिपूरकर, डॉ.योगेश साळे, कृष्णा गावडे आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देकोल्हापुरात जागतिक एडस दिनानिमित्त प्रभात फेरीएडस निर्मुलनासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा : धारुरकर

कोल्हापूर : मागील काही वर्षांच्या तुलनेत नवीन एचआयही संसर्गितांचे प्रमाण कमी होत आहे. २०३० पर्यंत हा आकडा शुन्यावर आणायचा आहे. यासाठी एड्स निर्मुलनाच्या कार्यात शासनाबरोबर समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन आरोग्य उपसंचालक डॉ. पी.पी. धारुरकर यांनी शनिवारी केले.

ते जिल्हा एड्स नियंत्रण पथक, सी.पी.आरतर्फे जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित प्रभात फेरीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, किर्लोस्कर आॅईल इंजिन्स लि. चे सह उपाध्यक्ष कृष्णा गावडे हे प्रमुख उपस्थित होते.

धारुरकर म्हणाले, एड्स नियंत्रणाचे उपक्रम राबविण्याच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे. जिल्हयामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण या कार्यामध्ये प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी उपक्रम यांनी पुढाकार घेऊन एच.आय.व्ही. निर्मुलनाची शास्त्रीय माहिती प्रत्येकांपर्यंत पोहोचवावी.

गेल्या वर्षभरात एड्स नियंत्रण क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ कामगिरी केल्यांबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र आळते ता. हातकणंगले, अनिश हॉस्पिटल, कुरुंदवाड, तसेच माहिती शिक्षण व संवाद क्षेत्रात भरीव योगदानाबद्दल उपजिल्हा रुग्णालय कोडोलीचे आय.सी.टी.सी. प्रयोगशाळा तंत्रज्ञ सतीश पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सी.जे. शिंदे यांचे यावेळी भाषण झाले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. सुप्रिया देशमुख, डॉ. हर्षला वेदक, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यु.जी. कुंभार यांचेसह जिल्हयातील एड्स नियंत्रण कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्याथीर्नी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, प्राध्यापक, तसेच मकरंद चौधरी, विनायक देसाई, क्रांतीसिंह चव्हाण, कपिल मुळे, शुभम पाटील, सागर पाटील, संदीप पाटील, अतुल पाटील, चंद्रकांत गायकवाड, अभिजीत रोटे उपस्थित होते. जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी स्वागत केले.

यावर्षी संवेदना शोध मोहिम हा कार्यक्रम राबविला जाणार असल्याचे ‘किर्लोस्कर’चे कृष्णा गावडे यांनी याप्रसंगी जाहीर केले. सुत्रसंचालन निरंजन देशपांडे यांनी केले. तुषार माळी यांनी आभार मानले.


 

 

Web Title: Prabhat Ferry on the occasion of World AIDS Day in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.