चंद्रशेखर गाडगीळ व संगीतकार चंद्रकांत कागले यांना प्रतिज्ञा नाट्यरंगतर्फे स्वरसुमनांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 05:49 PM2021-06-23T17:49:33+5:302021-06-23T18:09:31+5:30

music day Kolhapur : प्रतिज्ञा नाट्यरंगतर्फे जागतिक संगीत दिनानिमित्त पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ व संगीतकार चंद्रकांत कागले यांना सांगीतिक मैफिली द्वारे स्वरसुमनांजली अर्पण करण्यात आली. संस्थेच्या फेसबुक पेजवरुन या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले.

Pledge to Natyaranga | चंद्रशेखर गाडगीळ व संगीतकार चंद्रकांत कागले यांना प्रतिज्ञा नाट्यरंगतर्फे स्वरसुमनांजली

जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून प्रतिज्ञा नाट्यरंगच्यावतीने संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

Next
ठळक मुद्देचंद्रशेखर गाडगीळ व संगीतकार चंद्रकांत कागले यांना स्वरसुमनांजलीप्रतिज्ञा नाट्यरंगतर्फे जागतिक संगीत दिन

कोल्हापूर : प्रतिज्ञा नाट्यरंगतर्फे जागतिक संगीत दिनानिमित्त पार्श्वगायक चंद्रशेखर गाडगीळ व संगीतकार चंद्रकांत कागले यांना सांगीतिक मैफिली द्वारे स्वरसुमनांजली अर्पण करण्यात आली. संस्थेच्या फेसबुक पेजवरुन या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले.

स्नेहसंगीतप्रतिज्ञा उपक्रमाअंतर्गत सलग ८१२ दिवसातील या मैफिलीत प्रविण लिंबड आणि शिवलाल पाटील यांनी "सुख दुख की हर एक माला", "दूर है किनारा, "गोरी तेरा गांव बडा प्यारा" ही आणि इतर गीते सादर करून रंगत वाढवली. शेखर आयरेकर व आनंद पाटील यांनी "खिलते है गुल यहाँ", "कभी होती नही है",ही गाणी सादर केली.

गंगाराम जाधव व रमेश कांबळे यांनी "सांज ढले", "लगी आज सावन की", सूर्यकांत लोले व प्रदीप मिस्किन यांनी रिम झिम गीरे सावन", "ईक ना ईक दिन ये"ही गाणी सादर केली. विजय जाधव यांनी निवेदन केले. या मैफिलीच्या माध्यमातून एका रुग्णास औषधोपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली. यासाठी विकास मोने, रमेश सुतार, ज्ञानेश सुतार, सागर भोसले, मिलिंद अष्टेकर रोहन व सुनिल घोरपडे यांचे सहकार्य लाभले. प्रशांत जोशी यांनी संयोजन केले.

 

Web Title: Pledge to Natyaranga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.