वारणा पाणी योजनेस विरोध, घुणकी, भादोलेत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:55 PM2018-05-13T23:55:26+5:302018-05-13T23:55:26+5:30

Opposition to the Varna water scheme, Ghowki, Bhadolat closed | वारणा पाणी योजनेस विरोध, घुणकी, भादोलेत बंद

वारणा पाणी योजनेस विरोध, घुणकी, भादोलेत बंद

Next


नवे पारगाव/किणी/भादोले : इचलकरंजीच्या प्रस्तावित अमृत पाणी योजनेच्या विरोधात व निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील घुणकी व भादोले या दोन जिल्हा परिषद मतदारसंघात कडकडीत बंद पाळण्यात आला. वारणाकाठच्या चौदा गावांच्या नागरिकांनी पाठिंबा देत उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग नोंदविला.
मोटारसायकलची रॅली काढून प्रबोधन करण्यात आले. दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघांतील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव, चावरे, तळसंदे, वाठार, घुणकी, किणी, अंबप, अंबपवाडी, पाडळी, भादोले, मनपाडळे या गावांत शंभर टक्के बंद पाळून नागरिकांनी निषेध व्यक्त केला. नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
घुणकीचे सरपंच राजवर्धन मोहिते, माजी उपसरपंच प्रभाकर कुरणे, अशोकराव जाधव, तानाजी जाधव, वारणेचे संचालक सुभाष जाधव, किणीचे सरपंच बाळगोंडा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागप्रमुख संपतराव पोवार, अध्यक्ष शिवाजी माने, कृती समिती प्रमुख महादेव धनवडे, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजीराव सिद, ‘वारणा’चे संचालक महेंद्र शिंदे, वाठार सरपंच नारायण कुंभार, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सर्जेराव गायकवाड, अनिल शिंदे, आदींनी सहभाग घेतला.
दोन जिल्हा परिषद मतदारसंघांतील मोटारसायकल रॅलीची सांगता वाठार (हातकणंगले) येथील उड्डाण पुलाखाली निषेध सभेने झाली. या सभेत इचलकरंजीची पाणी योजना उधळून लावण्यासाठी कृती समितीला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे घुणकीचे सरपंच राजवर्धन मोहिते यांनी स्पष्ट केले.
वारणाकाठच्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी अमृत पाणी योजना उधळून लावणार आहोत. वारणेच्या पाण्याचा एक थेंबही इचलकरंजीला देणार नाही, असा सज्जड इशारा वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे यांनी दिला. वारणा बचाव कृती समितीस जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यासाठी दोन जिल्हा परिषद मतदारसंघात बंद ठेवून आंदोलनाचा पहिला टप्पा यशस्वी केला आहे. राज्य शासनाने अजून आपली भूमिका बदलली नाही तर यापुढे अजून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वारणा बचाव कृती समितीचे प्रमुख महादेव धनवडे यांनी दिला.
लढा यशस्वी करण्याचा निर्धार
वाठारचे सरपंच नारायण कुंभार यांनी वारणाकाठच्या लोकांनी वज्रमूठ बांधून या योजनेस कडाडून विरोध करावा, असे आवाहन केले. प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली वारणाकाठच्या जनतेचा लढा कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करणार, असे मत राष्ट्रवादीचे हातकणंगले तालुका उपाध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी योजनेमुळे शेतकºयांना होणाºया परिणामाची माहिती दिली.

Web Title: Opposition to the Varna water scheme, Ghowki, Bhadolat closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.