खगोलप्रेमींना सोमवारी उल्कावर्षाव पाहण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 11:27 AM2019-05-04T11:27:52+5:302019-05-04T11:29:23+5:30

खगोलप्रेमींना ६ मे रोजीच्या मध्यरात्रीनंतर आकाशामध्ये उल्कावर्षाव पाहायला मिळणार आहे.

The opportunity for astronomers to watch the meteor on Monday | खगोलप्रेमींना सोमवारी उल्कावर्षाव पाहण्याची संधी

खगोलप्रेमींना सोमवारी उल्कावर्षाव पाहण्याची संधी

Next
ठळक मुद्देखगोलप्रेमींना सोमवारी उल्कावर्षाव पाहण्याची संधीसहा मे रोजीच्या मध्यरात्री उल्कावर्षाव

कोल्हापूर : खगोलप्रेमींना ६ मे रोजीच्या मध्यरात्रीनंतर आकाशामध्ये उल्कावर्षाव पाहायला मिळणार आहे.

या वर्षावाचा उगमबिंदू कुंभ राशीत असेल; मात्र आकाशात सगळ्याच दिशेने उल्का पडताना दिसतील. दक्षिण गोलार्धातून साधारण ६0 पेक्षा जास्त, तर उत्तर गोलार्धातून साधारण ३0 उल्का प्रतितास दिसू शकतील.

हॅलेच्या धुमकेतूने मागे सोडलेल्या कचऱ्यामुळे हा उल्कावर्षाव घडून येतो. धुमकेतूच्या मार्गातले धुलीकण जेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे खेचले जातात, तेव्हा हवेशी झालेल्या घर्षणामुळे ते पेट घेतात, त्यालाच आपण ‘उल्का’ असे म्हणतो.


या दिवशी सायंकाळी लवकरच चंद्रकोर मावळून जाईल; त्यामुळे आकाशातील काळोख उल्कावर्षावाचा आनंद द्विगुणित करेल. उल्कावर्षाव पाहण्यासाठी शहरापासून दूर, सपाट आणि काळोख्या जागेची निवड करावी. ही एक निखळ खगोलीय घटना असून, प्रत्येकाने याचा आनंद घ्यावा.
डॉ. अविराज जत्राटकर
अध्यक्ष, अस्ट्रोनॉमी अँड स्टारगेझिंग सोसायटी आॅफ इंडिया
 

 

Web Title: The opportunity for astronomers to watch the meteor on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.