नागपंचमी नव्हे ‘सर्पपंचमी’ साजरी व्हावी-पश्चिम घाट सापांचा अधिवास-सर्पमित्रांना वाली कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:19 AM2018-08-10T00:19:23+5:302018-08-10T00:22:24+5:30

समाजात साप या सरपटणाऱ्या वन्यप्राण्याविषयी असणाºया गैरसमजुतीमुळे सापांची संख्या दिवसेंदिवस कमी होतआहे. सापाला स्व-संरक्षणासाठी दिलेली विषाची देणगीच त्यांच्यासाठी जीवघेणी ठरत आहे; कारण मानवाला सापाची जात ओळखता येत नाही. त्यामुळे दिसला साप की घ्या काठी अन् ठेचा डोकं!

Nagapanchami should not be celebrated 'Sarpapanchami' - Who are the Western Ghats domiciled with Snake-snakes? | नागपंचमी नव्हे ‘सर्पपंचमी’ साजरी व्हावी-पश्चिम घाट सापांचा अधिवास-सर्पमित्रांना वाली कोण?

नागपंचमी नव्हे ‘सर्पपंचमी’ साजरी व्हावी-पश्चिम घाट सापांचा अधिवास-सर्पमित्रांना वाली कोण?

Next

समाजात साप या सरपटणाऱ्या वन्यप्राण्याविषयी असणाºया गैरसमजुतीमुळे सापांची संख्या दिवसेंदिवस कमी होतआहे. सापाला स्व-संरक्षणासाठी दिलेली विषाची देणगीच त्यांच्यासाठी जीवघेणी ठरत आहे; कारण मानवाला
सापाची जात ओळखता येत नाही. त्यामुळे दिसला साप की घ्या काठी अन् ठेचा डोकं!
या मानसिकतेमुळे शेतकºयांचा मित्र असणाºया सापाकडे शत्रू म्हणून पाहिले जात आहे. सापाविषयीच्या लोकांच्यात असणाºया अज्ञानपणाबाबत जनजागृतीची चळवळ राबविली पाहिजे. त्यासाठी शासनाने अनेक वर्षांचा अनुभव असणाºया सर्पमित्रांना प्रमाणित करून तालुका स्तरावर नैसर्गिक आधिवासयुक्त सर्पालयाची आवश्यकता आहे.


पश्चिम घाट सापांचा अधिवास
संदीप आडनाईक
पश्चिम घाट हा जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय समृद्ध व श्रीमंत प्रदेश आहे. या परिसरात अनेक प्रकारचे सरिसृप आढळतात. सह्याद्रीच्या खोºयात अनेक दुर्मीळ सरिसृपांचा अधिवास आहे. सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाºया जंगल परिसरात सर्वसामान्य प्रकारच्या सापांचे वास्तव्य आहे. यात शोध न लागलेले अनेक सर्प जसे आहेत, तसे जगभरात नावाजलेल्या ‘इंडियन कोब्रा’ या नागराजाचेही वास्तव्य आहे. काही जातींचे साप शोधण्यासाठी सर्पतज्ज्ञ सतत जंगल परिसरात फिरत असतात. वरद गिरी, रमण कुलकर्णी यांसारखे कोल्हापूर परिसरातील संशोधक यासाठी सातत्याने जंगलभ्रमंती करीत असतातच. कोल्हापूर जिल्ह्यातही अनेक अभयारण्ये व जंगल परिसरात सरिसृपांचा वावर आहे. गिरी यांनी झाडावर राहणाºया सापाचाही शोध लावलेला आहे. तो त्यांच्या नावानेच ओळखला जातो. त्याला ‘रोका’ किंवा ‘गिरीज ब्राउल्स बॅकट्री स्नेक’ या नावानेही ओळखले जाते. हा साप बिनविषारी आहे.

ब्राह्मणी वॉर्म स्नेक (वाळा), पायड बेल्टेड शिल्डटेल (जमिनीखालील साप), माउंटेन ट्रिंकेट स्नेक (तस्कर), बॅँडेड कुकरी स्नेक, गिरीज ब्राउल्स बॅकट्री स्नेक, ड्यूमरिल्स ब्लॅक हेडेड स्नेक, चीअर्ड किलब्लॅक वॉटरस्नेक (विरुळा), बफ स्ट्रीप्ड किलबॅक, बेडोमस किलबॅक, इंडियन रॅट स्नेक (धामण), त्रावणकोर वुल्फ स्नेक (नानेटी), कॉमन वुल्फ स्नेक (नानेटी), कॉमन सॅँड बोआ (डुरक्या), व्हिटकर बोआ, इंडियन रॉक पायथॉन (अजगर), आॅलिव्ह फॉरेस्ट स्नेक, ग्रीन किलबॅक (गवत्या), कॉमन वाईन स्नेक (हरणटोळ ), ब्राउन वाईन स्नेक (हरणटोळाची नवी जात), फॉरेस्ट कॅटस्नेक (धामण), कॉमन इंडियन कॅट स्नेक, सेलॉन कॅट स्नेक, मलबार पिट वायपर, बांबू पिट वायपर, कॉमन इंडियन क्रेट (मण्यार), रसेल्स वायपर (घोणस), सॉ स्केल्ड वायपर आणि कोब्रा (नाग) अशा असंख्य जाती कोल्हापूरजवळच्या जंगल परिसरात आढळतात.
(ही माहिती कोल्हापूरचे मानद वन्यजीवरक्षक रमण कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘बायोडायव्हर्सिटी आॅफ सह्याद्री टायगर रिझर्व्ह’ कोल्हापूरच्या वन्यजीव विभागाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून घेतली आहे.)

साप पकडणारे ‘कुंभार’ कुटुंबीय
- सचिन भोसले
साप व नाग म्हटले की भल्या- भल्यांची बोबडी वळते. सर्वसामान्यांना असे विषारी, बिनविषारी नाग पकडणे तर दूरच. त्यात अख्ख कुटुंब साप पकडते म्हटले, तर नवलच म्हणावे लागेल. या सर्वांना अपवाद ठरलेले बापट कॅम्प येथील तानाजी कुंभार यांचे कुटुंब निराळेच म्हणावे लागेल. स्वत: तानाजी यांच्याबरोबर पत्नी अनिता, मुलगी तेजस्विनीसह २ लहानग्या देखील साप पकडतात. या कुटुंबाने विषारी व बिनविषारी असे १३ हजारांहून अधिक साप पकडले आहेत. विशेष म्हणजे १४ वर्षे यातून मिळालेल्या पैशांतून दर महाशिवरात्रीला महाप्रसाद केला जातो. नाग, साप मित्र आहेत, त्यांना मारू नका. अंधश्रद्धा दूर करा असे भाविकांचे प्रबोधन हे कुटुंब करते. तेजस्विनी तर लग्नानंतरही सासरी साप पकडते; त्यामुळे तिनेही आतापर्यंत १०० हून साप पकडले होते. ते तिने वडील तानाजी यांच्याकडे पाठविले. त्यांनी ते मोकळ्या जागेत सोडले.
साप पकडण्याची प्रेरणा माझे मूळ गाव एकोंडी येथील नागनाथ मंदिरामुळे मिळाली आहे. ते आपले मित्र आहेत; त्यामुळे याबाबत प्रबोधन करणे, काळाजी गरज आहे असे सर्पमित्र तानाजी कुंभार सांगतात.

सर्पमित्र श्याम नायर

- शेखर धोंगडे
केरळमध्ये साप कसा पकडायचा याचे प्रात्यक्षिक पाहिले होते. आठवीत असताना पहिला साप पकडला. त्यानंतर आजपर्यंत सुमारे १५00 च्या आसपास साप पकडून त्यांना सुरक्षित स्थळी सोडले आहे. रुईकर कॉलनी-त्रिमूर्ती सोसायटीतील सर्पमित्र श्याम नायर (वय ४५) हे व त्यांचे मित्र सुशांत टक्कळकी दोघे विनामूल्य व स्वखर्चाने काम करीत आहेत. दोघांनी मिळून रुईकर कॉलनी, कसबा बावडा, जाधववाडी, उजळाईवाडी, राजारामपुरी तसेच अग्निशमन दलाकडून अनेकदा बोलावणे आल्यास ते साप पकडण्यासाठी धाव घेतात. अनेकदा साप जखमी अवस्थेत सापडतात. त्यांना डॉ. अनिल पाटील यांच्या रुग्णालयात उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडतात.

वस्तीत सापडणारे साप अन् वनविभाग />यापंचमीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने मोबाईल दक्षता पथक नेमले आहे. सापांना खेळविणे किंवा पकडण्याचे प्रकार दिसल्यास किंवा कोणी तक्रार दिल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर वनविभागाचे सहायक वनसंरक्षक विजय गोसावी यांनी दिला आहे. वन्यजीव सप्ताहामध्ये १ ते ७ आॅक्टोबर मध्ये सर्पमित्रांसाठी कार्यशाळा असते. साप कसे पकडावेत, सर्पदंश झाल्यास प्राथमिक उपचार कसे करावेत, याचे प्रात्यक्षिक दिले जाते. सर्वसामान्यांनी जिवंत साप दिसल्यास वनविभागाच्या १९२६ या नंबरवर २४ तास सुरू असलेल्या टोलफ्रीवर माहिती दिल्यास तत्काळ मदत पुरविली जाते.
कायदा : वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ९ अनुसार शिकार करणे, कलम ५१ अंतर्गत ३ वर्षांची शिक्षा आहे. हाच गुन्हा त्याच व्यक्तीने पुन्हा केल्यास ७ वर्षांची शिक्षा व दंडाची तरतूद या कायद्यात आहे. या कायद्यानुसार कलम ९, ३९, ४८, ४९, ५0, ५१ अशा अनेक तरतुदी आहेत.

सर्पमित्र : कोल्हापूर वनविभागात स्वयंघोषित सर्पमित्रांची संख्या खूप आहे. सापांची तस्करी, विष काढून त्याची विक्री करणे, सर्पांचा गैरवापर करणे, यामुळे सर्पमित्र म्हणून परवानगी देण्याला सरकारकडून बंधने घातली आहे. कोल्हापूर शहर परिसरात १४ सर्पमित्र असून, फेब्रुवारीपासून आजअखेर एकूण १६ सापांना जीवदान दिले आहे.
सर्पमित्रांना वाली कोण?
शहरात, घरात शिरलेल्या सापाला पकडण्याऐवजी अनेकजण काठीने मारण्याचा प्रयत्न करतात. खरेतर वनविभागाकडून यासंदर्भात जनजागृतीची गरज असते; परंतु याउलट कधी कधी मदत करणाºया सर्पमित्रालाच त्यांच्याकडून कायद्याचा बडगा दाखवला जातो. खरेतर अशा कार्यासाठी मदत आणि प्रेरणा मिळायला हवी.
सर्पमित्रांच्या सुरक्षिततेसाठी काही उपाययोजना हव्या आहेत. याशिवाय त्यांना गमबुट, साप पकडण्यासाठी चांगल्या स्टिक, हॅन्डग्लोव्हज देण्याबरोबरच सर्पमित्रांना चुकून काही दंश झाला तर त्याला कोणतीच मदत मिळत नाही. त्यांचाही विमा उतरविलेला नसतो. अशा सर्पमित्रांना कोणीच वाली नसतो. हे एक समाजकार्यच आहे. याची वनविभागाला मदतच होते. विश्वासू सर्पमित्रांची नोंदणी करून त्यांना अधिकृत मान्यता आणि सुरक्षितता दिल्यास सर्पमित्रांना दिलासा मिळेल.याविषयी अंमलबजावणी गरजेची आहे.

बिनधास्त ऐश्वर्या मुनीश्वर : साप पकडायचा म्हटले की भल्याभल्यांची गाळण उडते. पण कोल्हापुरातील ऐश्वर्या मुनीश्वर या धाडसी मुलीने आजवर ६०० नाग, साप पकडून जंगलात सोडले आहेत. ऐश्वर्याचे भाऊ केदार व मंदार हे सर्पमित्र. फोन आला की ते साप पकडायला जायचे. बालमनाचे कुतूहल म्हणून ऐश्वर्याही जायची. साप-नागांची जीवनशैली, पकडण्याची पद्धत हे पाहून तिला आवड निर्माण झाली. भावांकडून अवघ्या दहाव्या वर्षी ती साप पकडायला शिकली. १३ वर्षांपासून सर्पमित्र म्हणून तिने नाग, घोणस, धामण, तस्कर यासारख्या अनेक जातींचे जवळपास सहाशे ते सातशे विषारी, बिनविषारी साप पकडले.
 

सर्पालयातून लोकशिक्षण देणारा अवलिया
- सरदार चौगुले, पोर्ले
पन्नगालय हा संस्कृत शब्दार्थ म्हणजे नागाची वस्ती. नागाच्या प्रमाणावरून पन्हाळा हे नाव पडल्याचे दाखले आजही देतात. पन्हाळा तालुक्यात पोर्ले तर्फ ठाणे येथील ११ वेळा सर्पदंश झालेले व सर्पमित्र म्हणून परिचीत दिनकर चौगुले यांनी १९८१ ला गावात एका खोलीत सर्पालय सुरू केले. अज्ञानपणामुळे बळी जाणाऱ्या सापांना पकडून त्यांचे संगोपन करून, त्यांना वनक्षेत्रात सोडण्याचा त्यांचा उपक्रम आजही सुरू आहे. परिसरातील लोकांनी सापांना जवळून अनुभवल्याने सापांबाबतचे नागरिकांच्या मनातील अज्ञानपण दूर करण्यात सर्पालयाचा चांगला उपयोग होत आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी पन्नास एक सर्पमित्र तयार केले. तत्कालीन जिल्हा वनाधिकारी गाडगीळ यांनी दिनकररावांच्या सापांबद्दलच्या लोकशिक्षण उपक्रमाची दखल घेतली. दिनकररावांकडे असणाºया सापांबाबतच्या सखोल ज्ञानाच्या जोरावर गाडगीळ यांनी १९८३ मध्ये पन्हाळा येथील तबक उद्यानात सर्पालय सुरू केले. येथे नागरी वस्तीत आढळलेल्या सापांना आणून संंगोपनानंतर त्यांना वनक्षेत्रात सोडले जायचे. किल्ले पन्हाळगडावर येणारे पर्यटक, अभ्यासकांना सापांविषयी या सर्पालयात दिनकरराव माहिती देत होते. सापांबाबत लोकशिक्षणाचा जागर होत होता, परंतु १९९२ ला काही तांत्रिक चुकांमुळे त्यांनी नोकरी सोडली. मात्र सापांच्या संवर्धनाविषयी जनजागृती कायम आहे. १९९४ पासून सर्पालय बंदिवासात गेले. त्या ठिकाणी सापांना नैसर्गिक अधिवास तयार करण्यात शासनाची नामुष्कीही कारणीभूत ठरली.

ही प्रथा  बदलली पाहिजे
नागपंचमीचे महत्त्व व पूर्वापरंपरा आजही ग्रामीण भागात मोठी आहे. कुंभार समाज पारंपरिक पद्धतीने पाच व सातफड्यांचे मातीचे नाग उत्तमरीत्या बनवीत असतात. त्याला याकाळात मागणीही असते. परंतु, खरेतर अशा फडांचे नाग नसतात. ही अंधश्रद्धा दूर करण्याची प्रथा आता कुंभार समाजाने पुढाकार घेऊन दूर केली पाहिजे.

Web Title: Nagapanchami should not be celebrated 'Sarpapanchami' - Who are the Western Ghats domiciled with Snake-snakes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.