कोल्हापूर : कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देऊ : सुरेश हाळवणकर; सिद्धगिरी कारागीर महाकुंभाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 06:33 PM2018-02-15T18:33:49+5:302018-02-15T18:36:55+5:30

‘सिद्धगिरी महासंस्थान’मधील कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार सुरेश हाळवणकर यांनी गुरुवारी येथे केले. देशाच्या कानाकोपऱ्यांतील विविध कारागिरी, कलांचा समावेश असलेल्या सिद्धगिरी कारागीर महाकुंभाचा भाविक, नागरिकांच्या गर्दीत समारोप झाला.

Let the artisan university get recognition: Suresh Halwankar; Sadhagiri Kargir Maha Kumbh concludes | कोल्हापूर : कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देऊ : सुरेश हाळवणकर; सिद्धगिरी कारागीर महाकुंभाचा समारोप

कोल्हापूर : कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देऊ : सुरेश हाळवणकर; सिद्धगिरी कारागीर महाकुंभाचा समारोप

Next
ठळक मुद्देकारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देऊ : सुरेश हाळवणकरसिद्धगिरी कारागीर महाकुंभाचा समारोपमहाकुंभाला आठ लाख लोकांची भेट

कोल्हापूर : ‘सिद्धगिरी महासंस्थान’मधील कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार सुरेश हाळवणकर यांनी गुरुवारी येथे केले. देशाच्या कानाकोपऱ्यांतील विविध कारागिरी, कलांचा समावेश असलेल्या सिद्धगिरी कारागीर महाकुंभाचा भाविक, नागरिकांच्या गर्दीत समारोप झाला.

कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानतर्फे हा कारागीर महाकुंभ आयोजित करण्यात आला होता. त्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. श्री विश्वकर्मा कारागीर नगरीतील या कार्यक्रमास राममंदिर न्यास कमिटीचे अध्यक्ष स्वामी रामविलास वेदांत, राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बसवराज पाटील, बेळगांवच्या मितान फौंडेशनचे गोपीकृष्णन, कोल्हापूर विभागाचे माहिती संचालक सतीश लळीत, प्रमुख उपस्थित होते.

आमदार हाळवणकर म्हणाले, सिद्धगिरी महासंस्थानचे काम भव्य-दिव्य आहे. हजारो वर्षांची कारागीर, कलांच्या जपण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल या कारागीर महाकुंभाच्या माध्यमातून पडले आहे. देशभरातील विश्वकर्मांना एकत्रित करून राबविलेला हा उपक्रम श्रमशक्तीचा महाकुंभ ठरला.

सिद्धगिरी कारागीर विद्यापीठाला शासनमान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन. आवश्यक त्या परवानगी देण्याची जबाबदारी माझी राहील. शेतकऱ्यांना आत्मविश्वास देण्यासाठी सिद्धगिरीवरील ‘लखपती शेती’चे तंत्रज्ञान देशभरात जाण्याची गरज आहे. त्यासह येथील गुरुकुल शिक्षणपद्धती ही देश बळकट करण्यास उपयुक्त ठरणार आहे. अशा गुरुकुल पद्धतीवरील शाळा शासनाने सुरू कराव्यात.

या कार्यक्रमात महाकुंभातील सहभागी कारागीरांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कारागीरांना ‘कोल्हापुरी फेटा’ बांधून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, बसंतकुमार सिंग, योगीप्रभू, रामबाबू, सुरेश पाटील, नाना पठारे, हिंदुराव शेळके, प्रताप कोंडेकर, आर. डी. शिंदे, डॉ. संदीप पाटील, आदी उपस्थित होते.

महाकुंभाला आठ लाख लोकांची भेट

या महाकुंभात देशाच्या कानाकोपऱ्यांतील १२० कारागीर सहभागी झाले. त्यांच्या माध्यमातून पाचशे कला, कारागिरीचे दर्शन घडले. दोनशेहून अधिक गायी, बैलजोड्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. महाकुंभाला पाच दिवसांत सुमारे आठ लाख लोकांनी भेट दिली. शंभर साधू-संत सिद्धगिरी मठावर आले. दरवर्षी कारागीर महाकुंभ भरविण्याचा विचार सिद्धगिरी महासंस्थान करत असल्याचे अमित हुक्केरीकर यांनी यावेळी सांगितले.
 

 

Web Title: Let the artisan university get recognition: Suresh Halwankar; Sadhagiri Kargir Maha Kumbh concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.