कोल्हापूरच्या 'स्वप्निल'चा आशियाई स्पर्धेत सुवर्ण वेध; आशियाई स्पर्धेत दमदार कामगिरी

By सचिन भोसले | Published: September 29, 2023 11:06 AM2023-09-29T11:06:41+5:302023-09-29T11:07:00+5:30

ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, अखिलेशवरण यांच्या साथीने थ्री पोझिशन प्रकारात यश

Kolhapur's 'Swapnil' won gold in the Asian Games; A strong performance in the Asian tournament |  कोल्हापूरच्या 'स्वप्निल'चा आशियाई स्पर्धेत सुवर्ण वेध; आशियाई स्पर्धेत दमदार कामगिरी

 कोल्हापूरच्या 'स्वप्निल'चा आशियाई स्पर्धेत सुवर्ण वेध; आशियाई स्पर्धेत दमदार कामगिरी

googlenewsNext

कोल्हापूर : चीन येथे सुरू असलेल्या आशियाई खेळ स्पर्धेत ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, अखिलेशवरण यांच्या साथीने मूळचा कोल्हापूरच्या वा सध्या सेंट्रल रेल्वेत नोकरीस असलेला स्वप्निल कुसाळे यांने सांघिक थ्री पोझिशन ५० मीटर रायफल प्रकारात सुवर्णवेध घेतला.
१७६९ गुण स्थापित केला. चीन दुसऱ्या क्रमांकावर आणि कोरिया क्रमांकावर राहिला.

मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी,वाळवे ( ता. करवीर) रहिवासी असलेल्या स्वप्निलने भोसला मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळत तेथूनच  रायफल प्रकारात नेमबाजीचे धडे गिरवले. जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी मजल दरमजल करीत त्यांनी यश मिळवले. स्वप्निल ने  यापूर्वी २०१५ साली कुवेत येथे झालेल्या सब ज्युनिअर आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत थ्री प्रोन प्रकारात पटकाविले. त्यानंतर तुघलता बाद  येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ५० मीटर पण पूर्ण प्रकारात सुवर्ण वेध घेतला होता. त्यानंतर तिरुवंतपुरम येथे झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतील त्यांनी याच प्रकारात ५०मीटर मध्ये सुवर्ण घेतला होता.

बापू येथे झालेला आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा त्याला त्याच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्यांने २०२२ कैरो येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात दोन सुवर्ण, दोन रौप्य पदक मिळवली. त्यानंतर बापू येथे झालेल्या स्पर्धेतील त्यांनी अभूतपूर्व यश मिळवले. याच यशाच्या जोरावर त्याने २०२४ टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक कोटा मिळवत स्पर्धेचे तिकीट पटकावले.

स्वप्निल ने या स्पर्धेत ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर याच्या ही पेक्षा थ्री पोझिशन ५० मीटरमध्ये ५९१ गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले. या तिघांची सांघिक कामगिरी विश्वविक्रमी  ठरलेले आहे. त्याला आंतरराष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक दिपाली देशपांडे मार्गदर्शन करीत आहेत. 
 

Web Title: Kolhapur's 'Swapnil' won gold in the Asian Games; A strong performance in the Asian tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.