कोल्हापूर : नही चलेगी, दादागिरी नही चलेगी, ‘शिक्षण वाचवा समिती’तर्फे नोटीसांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 02:31 PM2018-03-14T14:31:30+5:302018-03-14T14:35:30+5:30

मुख्याध्यापकांना नोटीस बजावून, शाळा परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवून पालकमंत्री आणि शासनाने शिक्षण वाचवा नागरी कृती समितीचे आंंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध बुधवारी समितीने संबंधित नोटीसांची होळी करुन केला. यावेळी समितीचे कार्यकर्ते, विविध शाळांतील शिक्षकांनी ‘नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’, ‘आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या शासनाचा धिक्कार असो’, अशा निषेधाच्या जोरदार घोषणा देत दसरा चौक परिसर दणाणून सोडला.

Kolhapur: Will not run, Dadagiri will not work, 'Holi' notice issued by 'Save the Committee' | कोल्हापूर : नही चलेगी, दादागिरी नही चलेगी, ‘शिक्षण वाचवा समिती’तर्फे नोटीसांची होळी

कोल्हापूर : नही चलेगी, दादागिरी नही चलेगी, ‘शिक्षण वाचवा समिती’तर्फे नोटीसांची होळी

Next
ठळक मुद्देनही चलेगी, दादागिरी नही चलेगी, निषेधाच्या जोरदार घोषणा ‘शिक्षण वाचवा समिती’तर्फे नोटीसांची होळी पालकमंत्र्यांनी विरोध सोडून सहकार्य करावे

कोल्हापूर : मुख्याध्यापकांना नोटीस बजावून, शाळा परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवून पालकमंत्री आणि शासनाने शिक्षण वाचवा नागरी कृती समितीचे आंंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्याचा निषेध बुधवारी समितीने संबंधित नोटीसांची होळी करुन केला.

यावेळी समितीचे कार्यकर्ते, विविध शाळांतील शिक्षकांनी ‘नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’, ‘आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या शासनाचा धिक्कार असो’, अशा निषेधाच्या जोरदार घोषणा देत दसरा चौक परिसर दणाणून सोडला.

सरकारमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे राजर्षी शाहूंच्या नगरीचे प्रतिनिधीत्त्व करतात. आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करुन त्यांच्याकडून शिक्षणाचा हक्क पायदळी तुडविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांनी विरोध करणे सोडून शिक्षण वाचविण्यासाठी सहकार्य करावे. समिती त्यांच्यासमवेत चर्चेसाठी तयार असल्याचे समितीचे समन्वयक अशोक पोवार यांनी सांगितले.


राज्य शासनाने शाळा बंद करुन त्याचे कंपनीकरण करण्याचे धोरण अवलंबले आहे. ते धोरण मागे घ्यावे यामागणीसाठी कोल्हापुरातील शिक्षण वाचवा नागरी कृती समितीने जनआंदोलन सुरू केले आहे. याअंतर्गत समितीने मंगळवारी सामुदायिक परिपाठ आंदोलन केले. यात सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकासमवेत लोकशाही मार्गाने आंदोलन केले. ते आंदोलन दडपण्यासाठी मुलांना या आंदोलनात सहभागी होवू देऊ नये असा आदेश शिक्षण विभागाने काढला.

मुख्याध्यापकांना नोटीस बजविण्यात आल्या. याबद्दल पालकमंत्री आणि शासनाचा निषेध समितीने बुधवारी दुपारी दसरा चौकात या नोटीसांची होळी केली. ‘नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’, ‘सर्वसामान्यांचे शिक्षण वाचलेच पाहिजे’, अशा जोरदार घोषणा दिल्या.

यानंतर येथे समन्वयक अशोक पोवार, गिरीश फोंडे यांची भाषणे झाली. या आंदोलनात समितीचे रमेश मोरे, संभाजीराव जगदाळे, गिरीश फोंडे, गणी आजरेकर, सुभाष देसाई, महादेव पाटील, लालासो गायकवाड, राजाराम सुतार, दिनकर कांबळे, रामभाऊ काळेकर, सुंदरराव देसाई, लहू शिंदे, राजेश वरक, एस. डी. लाड, संतोष आयरे, दस्तगीर मुजावर, मोहन आवळे, राजू कोरे, शिवाजी कुंभार, मनोहर घोलपे, अरविंद चव्हाण, गौतम कांबळे, धीरज पारधी, शिलाताई कांबळे, सुदर्शन सुतार, नितीन पानारी, पल्लवी वडणेरकर, दिलीप माने, फिरोज खान उस्ताद, रविंद्र कांबळे, किशोर घाटगे, पंढरी शिंदे, प्रकाश पाटील, संदीप शिंगे, अमोल पाटील, उमेश देसाई, संजय पाटील, शंकर काटाळे आदी सहभागी झाले.

‘जबाव दो’आंदोलन गुरुवारी

समितीने केलेल्या सामुदायिक परिपाठ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालकांनी मुख्याध्यापक, शिक्षकांसाठी रविवारी (दि. १८) आदेश काढला. तो कोणत्या नियमाअंतर्गत काढला हे जाणून घेण्यासाठी समितीतर्फे गुरुवारी दुपारी बारा वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयात जबाव दो आंदोलन केले जाणार आहे, असे समितीचे समन्वयक रमेश मोरे यांनी सांगितले.

 

Web Title: Kolhapur: Will not run, Dadagiri will not work, 'Holi' notice issued by 'Save the Committee'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.