कोल्हापूर : राजाराम महोत्सवास प्रारंभ,  राजाराम महाविद्यालय म्हणजे ‘आॅक्सफर्ड’च - डॉ. पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 05:20 PM2019-01-03T17:20:50+5:302019-01-03T17:22:24+5:30

शतकोत्तर परंपरा असलेले राजाराम महाविद्यालय हे त्या काळातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘आॅक्सफर्ड’ विद्यापीठासारखेच होते, असे गौरवोद्गार काढत राजारामीयन असल्याचा अभिमान बाळगा, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केले.

Kolhapur: Start of Rajaram Mahotsav, Rajaram College means 'Oxford' - Dr. Pawar | कोल्हापूर : राजाराम महोत्सवास प्रारंभ,  राजाराम महाविद्यालय म्हणजे ‘आॅक्सफर्ड’च - डॉ. पवार

कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी राजाराम महोत्सवाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना शाहू छत्रपती. डावीकडून प्राचार्य ए. एस. खेमनार. डॉ. जयसिंगराव पवार, प्रा. डॉ. अनिता बोडके, प्रा. डॉ. अंजली पाटील, आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देराजाराम महाविद्यालय म्हणजे ‘आॅक्सफर्ड’च - डॉ. पवारराजाराम महोत्सवास प्रारंभ; दोन दिवस रंगणार महोत्सव

कोल्हापूर : शतकोत्तर परंपरा असलेले राजाराम महाविद्यालय हे त्या काळातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘आॅक्सफर्ड’ विद्यापीठासारखेच होते, असे गौरवोद्गार काढत राजारामीयन असल्याचा अभिमान बाळगा, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केले.
"
राजाराम महाविद्यालयातर्फे आयोजित राजाराम महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती उपस्थित होते. दरम्यान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

डॉ. पवार म्हणाले, राजाराम महाविद्यालयाची इमारत ही फक्त इमारत नसून तिला फार मोठा इतिहास आहे. दक्षिण महाराष्ट्रातील एकमेव हे महाविद्यालय होते. पुणे सोडले तर बंगलोर, धारवाड त्यानंतर हेच महाविद्यालय होते. माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत नाव मिळविले आहे. देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब देसाई हे याच महाविद्यालयातील विद्यार्थी होत. यासह माजी प्राचार्य बाळासाहेब खर्डेकर यांनी पुढच्या महिन्यातील पगारही विद्यार्थ्यांसाठी खर्च केला.

असा प्राचार्य फक्त राजाराम महाविद्यालयाचा असू शकतो. महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या दंग्यामुळे त्यांनी प्राचार्यपदाचा राजीनामा दिला. त्याच विद्यार्थ्यांनी खर्डेकर सरांची माफी मागून त्यांचा राजीनामा मागे घ्यायला लावला. अशा अनेक चांगल्या व गोड आठवणी या महाविद्यालयास लाभल्या आहेत.

अध्यक्षीय भाषणात शाहू महाराज यांनी राजाराम महाराज यांच्या इतिहासाच्या आठवणी सांगितल्या. राजाराम महाविद्यालयातून आताचे विद्यार्थी उद्याच्या महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने झाली. यावेळी अमृता कदम, स्वराली कडू यांनी नृत्य सादर केले. याप्रसंगी संयोजक प्रमुख डॉ. अनिता बोडके यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. प्राचार्य ए. एस. खेमनार यांनी आभार व्यक्त केले. डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी आभार मानले.

याप्रसंगी माजी आमदार श्रीपतराव शिंदे, बालकल्याण संकुलचे उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर, डॉ. विजयकुमार माने, माजी जी. एस. शशिकांत पाटील, प्रा. डॉ. अंजली पाटील, प्रा. डॉ. संजय पठारे, जयदीप मोहिते, हेमंत पाटील, प्रवीण खडके, शशांक पाटील, दीपक जमेनीस, जबीन शेख, अर्पणा पाटील, मिलिंद दीक्षित, आदी उपस्थित होते.

शिट्ट्या वाजल्या पाहिजेत

मला वाटले, भाषणाला दंगा होणार नाही; मात्र तुम्ही भाषणाला टाळ्यांसह शिट्ट्या वाजवल्या; यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही राजारामियन असल्याचा मला अभिमान वाटला असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

दिवसभर महाविद्यालयावर धूम

दरम्यान, या महोत्सवांतर्गत मेहंदी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये ४० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. गं्रथालयात सुरू असणाºया रांगोळी स्पर्धेतही ४२ जणांनी सहभाग नोंदविला. सामाजिक संदेश देणाºया रांगोळीसह निसर्गप्रेम व्यक्त करणाºया रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सॅलेड डेकोरेशन स्पर्धेतही सतरा मुलींनी सहभाग नोंदविला. याचवेळी फेस मेकिंग स्पर्धाही घेण्यात आल्या. यासह येथील सेल्फी पॉइंटवर माजी विद्यार्थ्यांनी फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

विद्यार्थ्यांकडून अनोखी मानवंदना

मी या ठिकाणी येण्यासाठी संयोजकांनी मला किती मानधन घेणार, असे विचारले. त्यावेळी हे माझे महाविद्यालय आहे; मला मानधन नको, असे सांगत डॉ. पवार यांनी महाविद्यालयाला त्यांनी लिहिलेले गं्रथ भेट दिले. पवार यांचे भाषण संपताच सभागृहातील सर्व विद्यार्थ्यांनी जागेवर उभे राहून जोरदार टाळ्यांच्या गजरात पवार यांना अनोखी मानवंदना दिली.

 

 

Web Title: Kolhapur: Start of Rajaram Mahotsav, Rajaram College means 'Oxford' - Dr. Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.