कोल्हापूर : शाहीर राजू राऊत राजर्षी शाहूंच्या पुण्यतिथीदिवशी "डि.लिट्."ने सन्मानित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 05:16 PM2018-05-07T17:16:15+5:302018-05-07T17:16:15+5:30

बहूरंगी व बहूढंगी कलाकार शाहीर राजू राऊत याना राजर्षी शाहूंच्या पुण्यतिथीदिवशी नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीने "डि.लिट्."ने सन्मानित केले.

Kolhapur: Shahir Raju Raut Rajshahi Shahu's death anniversary "D.Litt." Is honored! | कोल्हापूर : शाहीर राजू राऊत राजर्षी शाहूंच्या पुण्यतिथीदिवशी "डि.लिट्."ने सन्मानित !

कोल्हापूर : शाहीर राजू राऊत राजर्षी शाहूंच्या पुण्यतिथीदिवशी "डि.लिट्."ने सन्मानित !

ठळक मुद्देशाहीर राजू राऊत "डि.लिट्."ने सन्मानित !राजर्षी शाहूंच्या पुण्यतिथीदिवशी डि.लिट्. प्रदान

कोल्हापूर : बहूरंगी व बहूढंगी कलाकार शाहीर राजू राऊत याना राजर्षी शाहूंच्या पुण्यतिथीदिवशी नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीने "डि.लिट्."ने सन्मानित केले.

गेली चाळिस वर्षे ऐतिहासिक, तसेच कला व संस्कृतीचा वैभवी वारसा जतन करण्यासाठी धडपडणाऱ्या आणि त्याबरोबरच पुरोगामी सामाजिक व पर्यावरणीय चळवळींना बळ देण्यासाठी लेखणी व डफ हाती घेतलेल्या शाहीर राजू राऊत याना रविवारी म्हणजे राजर्षी शाहूंच्या पुण्यतिथीदिवशी नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीने "डि.लिट्."ने सन्मानित केले.

राऊत हे बहूरंगी व बहूढंगी कलाकार असले तरी केवळ शिवस्तुती आणि सामाजिक हितासाठीच शाहिरी व डफ वापरायचा या बाण्याने शाहिरी जपण्याच्या अव्यभिचारी निष्ठेचाही यामुळे सन्मान झाला आहे.



कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेचे सरचिटणीस अजित आयरेकर यानी एका पत्रकाद्वारे या सन्मानाची माहिती दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की,"वरळी सी फेस येथील सिल्व्हर ओक या वास्तूत देशा परदेशातील महनीय व्यक्तिंच्या ऊपस्थितीत झालेल्या समारंभात स्वतः डॉ. डी.वाय.पाटील यांच्या हस्ते शाहीर राऊत याना डि.लिट्. प्रदान करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. शिरीष पाटील, माँरिशसचे ऊच्चायुक्त जगदीश्वर गोस्क, तसेच राऊत यांच्या पत्नी सुनीता व कन्या चैत्रा आणि सहकाऱ्यांचीही ऊपस्थिती होती.

एक वेगळाच योगायोग

एकवीस वर्षांपूर्वी राजर्षी शाहू जयंतीला शाहीर राऊत यांनी कानपूरमधील शाहू मेळा "निमित्ताने शिव-शाहू पोवाडा पथक सुरु केले होते आणि राजर्षी शाहू पुण्यतिथीदिवशी त्यांना डि.लिट्.चा सन्मान लाभला हा एक वेगळाच योगायोग आहे.अर्थात असा सन्मान शाहीर राऊत याना लाभला याला त्यांनी अथकपणे शाहिरी,चित्रकला,शिल्पकला,छायाचित्रण, तसेच इतिहास व सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी दिलेले योगदा जसे कारणीभूत आहे , त्याचप्रमाणे डॉ. डी.वाय.पाटील यांनी दाखविलेली गुणग्राहकताही कारणीभूत आहे."

Web Title: Kolhapur: Shahir Raju Raut Rajshahi Shahu's death anniversary "D.Litt." Is honored!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.