कोल्हापूर : सराफाच्या फलॅटमधून दीड लाखांची रोकड लंपास, जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:36 PM2018-01-05T14:36:04+5:302018-01-05T14:38:07+5:30

मंगळवार पेठ येथील सराफाच्या बंद फलॅटच्या खिडकीचे लोखंडी गज वाकवुन चोरट्याने तिजोरीतील दीड लाखांची रोकड लंपास केली. चोरीची घटना गुरुवारी उघडकीस आली. चोरी झालेचे लक्षात येताच राठोड यांनी जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ​​​​​​​

Kolhapur: Rs 1.5 lakh cash lump sum, Junarajwada police station case in Balat's flat | कोल्हापूर : सराफाच्या फलॅटमधून दीड लाखांची रोकड लंपास, जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद

कोल्हापूर : सराफाच्या फलॅटमधून दीड लाखांची रोकड लंपास, जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद

Next
ठळक मुद्देजुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याददीड लाखाची रोकड गायब खिडकीचे गज वाकलेले, तिजोरीतील साहित्यही विस्कटले

कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील सराफाच्या बंद फलॅटच्या खिडकीचे लोखंडी गज वाकवुन चोरट्याने तिजोरीतील दीड लाखांची रोकड लंपास केली. चोरीची घटना गुरुवारी उघडकीस आली.

अधिक माहिती अशी, सुरेश भोपाळचंद राठोड (वय ४३, रा. पुण्यपवित्र सोसायटी, मंगळवार पेठ) हे चौथ्या मजल्यावर फलॅट नं. ४०१ मध्ये राहतात. त्यांचे भेंडे गल्ली येथे सराफाचे दूकान आहे. दि. २० डिसेंबर २०१७ रोजी ते कुटूंबासह मुळ गावी राजस्थानला गेले होते.

गुरुवारी (दि. ४) घरी परत आलेनंतर खिडकीचे गज वाकलेले दिसले. तसेच तिजोरीतील साहित्यही विस्कटले होते. त्यातील दीड लाखाची रोकड गायब असलेचे दिसून आले. चोरी झालेचे लक्षात येताच राठोड यांनी जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

गृह पोलीस उपअधीक्षक सतिश माने यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सराईत चोरट्याचे हे कृत्य असून त्यादूष्ठीने तपास करण्याच्या सुचना माने यांनी दिल्या. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल गुजर करीत आहेत.
 

 

Web Title: Kolhapur: Rs 1.5 lakh cash lump sum, Junarajwada police station case in Balat's flat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.