कोल्हापूर : आजी-माजी विद्यार्थ्यांच्या गर्दीने ‘राजाराम महोत्सव’ बहरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 05:31 PM2019-01-04T17:31:27+5:302019-01-04T17:36:28+5:30

आयुष्यात जे स्वप्न पहाल ते साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहा. करिअरसाठी आवडीचे क्षेत्र निवडा. त्यामध्ये कष्ट आणि स्वत:शी स्पर्धा करा. त्यातून निश्चितपणे यश मिळेल, असे प्रतिपादन भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी शुक्रवारी केले.

Kolhapur: The 'Rajaram Mahotsav' emerged with the crowd of grand-students | कोल्हापूर : आजी-माजी विद्यार्थ्यांच्या गर्दीने ‘राजाराम महोत्सव’ बहरला

 कोल्हापुरात शुक्रवारी राजाराम महोत्सवात भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून ए. एस. खेमनार, अनिता बोडके उपस्थित होत्या. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देआजी-माजी विद्यार्थ्यांच्या गर्दीने ‘राजाराम महोत्सव’ बहरलाकष्ट करा, निश्चितपणे यश मिळेल : हणमंतराव गायकवाड

कोल्हापूर : आयुष्यात जे स्वप्न पहाल ते साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहा. करिअरसाठी आवडीचे क्षेत्र निवडा. त्यामध्ये कष्ट आणि स्वत:शी स्पर्धा करा. त्यातून निश्चितपणे यश मिळेल, असे प्रतिपादन भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी शुक्रवारी केले.

येथील राजाराम महाविद्यालयातर्फे आयोजित राजाराम महोत्सवात ते बोलत होते. महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहातील या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. ए. एम. खेमनार, महोत्सवाच्या संयोजनप्रमुख डॉ. अनिता बोडके उपस्थित होत्या. नेल आर्ट, हेअर स्टाईल अशा विविध स्पर्धा, यशस्वीतांचे मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आजी-माजी विद्यार्थ्यांच्या गर्दीने दुसऱ्या दिवशी हा महोत्सव बहरला आहे.

कोल्हापुरात शुक्रवारी राजाराम महोत्सवातील सेल्फी पॉर्इंट येथे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी असा सेल्फी टिपून आनंद व्यक्त केला. (छाया : नसीर अत्तार)

गायकवाड म्हणाले, आपल्याजवळ असणारी कोणतीही कल्पना कायमस्वरूपी आणि टिकणारी असायला हवी. त्यामागे ध्येयाने मागे लागल्यास पाहिजे तो व्यवसाय करण्यास मदत मिळते. उद्योग, व्यवसायातील यशासाठी टीमवर्क महत्त्वाचे ठरते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षणासह संघर्ष आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा.

कोणतेही काम करत असताना ते सर्वोत्तम करा. प्राचार्य डॉ. खेमनार म्हणाले, खोटा अविर्भाव आणत जगण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेवत वेळीच सुधारणा केली, तरच यशस्वी होता येते. या कार्यक्रमात प्रा. डॉ. अंजली भागवत यांनी सूत्रसंचालन केले. उल्हास भागवत यांनी आभार मानले. दरम्यान, महोत्सवात दुपारी कथाकार आप्पासाहेब खोत यांचा कथाकथन आणि सायंकाळी ऋषीकेश जोशी, डॉ. शरद भुथाडिया यांचा एकपात्री प्रयोग रंगला.

जिद्दीने काम केले

स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून कामाला सुरुवात केली. जिद्दीने काम करत गेलो. उत्तम काम केल्यामुळेच यश मिळविता आले, असे गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले, पुढील वर्षात किमान १0 कोटी लोकांच्या आयुष्यात परिवर्तन करण्याचा प्रयत्न राहणार आहे. विद्यार्थ्यांनी नुसते चांगले नव्हे, तर सर्वोत्तम काम करण्याचा ध्यास घ्यावा.

 

 

 

Web Title: Kolhapur: The 'Rajaram Mahotsav' emerged with the crowd of grand-students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.