कोल्हापूर : मद्यपी गुन्हेगाराची लक्षतीर्थमध्ये दहशत, नागरिकांत भीती : बंदोबस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 11:27 AM2018-07-30T11:27:00+5:302018-07-30T11:29:49+5:30

चोरी, लुटमारी, हाणामारी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराने लक्षतीर्थ वसाहत परिसरात मद्यधुंद अवस्थेत हातात कुऱ्हाड घेऊन प्रचंड दहशत माजविली. महिला, तरुण यांच्यासह पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली. त्याच्या दहशतीपुढे एकही नागरिक तक्रार देण्यास पुढे आला नाही. गेल्या दोन दिवसांपासून नागरिक भीतीच्या छायेत आहेत.

Kolhapur: Panic in the face of alcoholic crime; fear of civilians: demand for settlement | कोल्हापूर : मद्यपी गुन्हेगाराची लक्षतीर्थमध्ये दहशत, नागरिकांत भीती : बंदोबस्त करण्याची मागणी

कोल्हापूर : मद्यपी गुन्हेगाराची लक्षतीर्थमध्ये दहशत, नागरिकांत भीती : बंदोबस्त करण्याची मागणी

Next
ठळक मुद्देमद्यपी गुन्हेगाराची लक्षतीर्थमध्ये दहशतनागरिकांत भीती : बंदोबस्त करण्याची मागणी

कोल्हापूर : चोरी, लुटमारी, हाणामारी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराने लक्षतीर्थ वसाहत परिसरात मद्यधुंद अवस्थेत हातात कुऱ्हाड घेऊन प्रचंड दहशत माजविली. महिला, तरुण यांच्यासह पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली. त्याच्या दहशतीपुढे एकही नागरिक तक्रार देण्यास पुढे आला नाही. गेल्या दोन दिवसांपासून नागरिक भीतीच्या छायेत आहेत.

लक्षतीर्थ वसाहतीमध्ये पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराने दोन दिवसांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत अर्धनग्न अवस्थेत हातात कुऱ्हाड घेऊन परिसरात प्रचंड दहशत माजविली. महिला, तरुणांसह पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना अडवून पुढे याल तर तोडून टाकीन, अशी धमकी देत कुऱ्हाड फिरवत होता. त्याचा रुद्र अवतार पाहून पुढे जाण्याचे धाडस कोणी केले नाही. त्याच्या या रोजच्या दहशतीमुळे महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल होऊन बसले आहे.

लहान मुलेही बिथरली आहेत. लक्ष्मीपुरी पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पोलीसही आपले काय करू शकत नाहीत, अशा समजुतीपोटी या गुन्हेगाराने प्रचंड दशहत माजविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परिसरातील खाद्य विक्रेत्यांना धमकावून त्यांच्याकडून फुकटात खाद्यपदार्थ घेत आहे. तो पोलिसांचा खबऱ्या असल्याने त्याच्या विरोधात कोणी पोलीस ठाण्याला फोन करीत नाही.

फोन केल्यास त्याला संबंधित नागरिकाचे नाव समजते. त्यानंतर तो त्रास देण्यास सुरू करतो. यामुळे त्याच्याशी कोणी वाकडे घेत नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या या मद्यपी गुन्हेगाराची दादागिरी पोलिसांनी मोडीत काढून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

 

Web Title: Kolhapur: Panic in the face of alcoholic crime; fear of civilians: demand for settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.