कोल्हापूर : सशस्त्र सेना झेंडा दिनानिमित्त स्पर्धेत न्यू कॉलेज, उषाराजे, आदींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 05:38 PM2018-12-05T17:38:28+5:302018-12-05T17:47:33+5:30

सशस्त्र सेना झेंडा दिनानिमित्त छत्रपती संभाजीराजे फौंडेशनतर्फे आयोजित केलेल्या पथनाट्य स्पर्धेत न्यू कॉलेज, कोल्हापूर पब्लिक स्कूलने, तर समूहगीत स्पर्धेत उषाराजे हायस्कूल व वैयक्तिक गीत गायनात शर्वरी जोग हिने प्रथम क्रमांक पटकाविला.

Kolhapur: New College, Boogie, etc. Between the Armed Forces Zenda Dinner | कोल्हापूर : सशस्त्र सेना झेंडा दिनानिमित्त स्पर्धेत न्यू कॉलेज, उषाराजे, आदींची बाजी

 कोल्हापुरातील भवानी मंडप येथे सशस्त्र सेना झेंडा दिनानिमित्त छत्रपती संभाजीराजे फौंडेशनतर्फे बुधवारी आयोजित केलेली पथनाट्य स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देसशस्त्र सेना झेंडा दिनानिमित्त स्पर्धेत न्यू कॉलेज, उषाराजे, आदींची बाजी छत्रपती संभाजीराजे फौंडेशनतर्फे आयोजन; पथनाट्य, समूहगीत स्पर्धा

कोल्हापूर : सशस्त्र सेना झेंडा दिनानिमित्त छत्रपती संभाजीराजे फौंडेशनतर्फे आयोजित केलेल्या पथनाट्य स्पर्धेत न्यू कॉलेज, कोल्हापूर पब्लिक स्कूलने, तर समूहगीत स्पर्धेत उषाराजे हायस्कूल व वैयक्तिक गीत गायनात शर्वरी जोग हिने प्रथम क्रमांक पटकाविला.

भवानी मंडप येथे बुधवारी आयोजित केलेल्या या स्पर्धेत जिल्हाभरातून ७० हून अधिक शाळा, महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन संयोगिताराजे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे, पथनाट्य - आंतरशालेय विभाग - कोल्हापूर पब्लिक स्कूल, विद्यादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल, आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, महाविद्यालयीन विभाग - न्यू कॉलेज, शिवाजी विद्यापीठ, सी.पी.आर. नर्सिंग कॉलेज, कोल्हापूर.

समूहगीत स्पर्धा - उषाराजे हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, दत्ताबाळ इंग्लिश स्कूल, वि. स. खांडेकर प्रशाला, तर वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत शर्वरी जोग, वर्षा चव्हाण, स्वाती बेविनकट्टी, अनिता कांबळे यांनी बाजी मारली.

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. आनंद धर्माधिकारी, निशांत गोंधळी, सचिन कचोटे, श्रेयस मोहिते, शैलेश शिंदे, युवराज गावडे यांनी काम पाहिले. यावेळी फौंडेशनचे रविराज निंबाळकर, उदय घोरपडे, शाहीर आझाद नायकवडी, नरेंद्र इनामदार, आदी उपस्थित होते.

 

 

Web Title: Kolhapur: New College, Boogie, etc. Between the Armed Forces Zenda Dinner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.