कोल्हापूर : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास सर्वांच्या योगदानाची गरज:  सुदर्शन भगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 06:19 PM2018-02-13T18:19:53+5:302018-02-13T18:22:54+5:30

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरीवर्गाच्या सर्वांगीण विकासातच देशाची प्रगती अवलंबून आहे. त्यासाठीच सन २०२२ पर्यंत अर्थात देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी शेतकरी राजाचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.

Kolhapur: Need for the contribution of farmers to double the income of farmers: Sudarshan Bhagat | कोल्हापूर : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास सर्वांच्या योगदानाची गरज:  सुदर्शन भगत

कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानतर्फे आयोजित कारागीर महाकुंभाला केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी भेट दिली. यावेळी बसंतकुमार सिंग, गोपाल उपाध्याय आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देसिद्धगिरी कारागीर महाकुंभ; महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दीशेतकरी राजाचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज : भगत

कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानतर्फे आयोजित कारागीर महाकुंभाला केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी भेट दिली. यावेळी बसंतकुमार सिंग, गोपाल उपाध्याय आदी उपस्थित होते.

कोल्हापूर : भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरीवर्गाच्या सर्वांगीण विकासातच देशाची प्रगती अवलंबून आहे. त्यासाठीच सन २०२२ पर्यंत अर्थात देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी शेतकरी राजाचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.

कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे आयोजित कारागीर महाकुंभाला मंत्री सुदर्शन भगत यांनी भेट दिली. महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी सिद्धगिरी मठावर भाविकांची अलोट गर्दी झाली. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यांतून भाविक दर्शनासाठी आले होते. त्यामुळे मठाचा परिसर गर्दीने फुलून गेला.

मंत्री सुदर्शन भगत म्हणाले, शेती व ग्रामीण परंपरागत उद्योगाकडे झालेले दुर्लक्ष हे फार चिंतनीय असून ही चूक वेळीच सुधारली पाहिजे. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते ‘ज्ञानदूत’ आणि ‘आरोग्य मंत्रा’ या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.

विजय कदम, मुक्ता दाभोलकर, विवेक सिद्ध, चंद्रशेखर, रूपाश्री सिद्धापुरे, डॉ. दत्ता निकम, सचिन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, राजेश आयदे, बसंतकुमार सिंग, आदी उपस्थित होते.

दरम्यान, सिद्धगिरी मठ येथे मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती आणि विधिवत पूजनाने ‘महाशिवरात्री उत्सव’चा प्रारंभ झाला. यावेळी मंत्री सुदर्शन भगत, फत्तेपूर (उत्तर प्रदेश) येथील स्वामी विज्ञानानंद प्रमुख उपस्थित होते.

 

कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानतर्फे आयोजित कारागीर महाकुंभाला केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कोल्हापूरचे चित्रकार सुनील पंडित यांच्याकडून आपले चित्र रेखाटून घेतले.

यानंतर मंत्री भगत यांनी सिद्धगिरी कारागीर महाकुंभाला त्यांनी भेट देऊन तेथील कलाकारांनी निर्माण केलेल्या विविध कलात्मक वस्तूंची निर्मितीसह माहिती घेतली.

अदिवासी युवक-युवतींसाठी आश्रमशाळा

आश्रमशाळा संस्कृतीमधूनच आपण आदिवासी युवक ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत प्रगती केली आहे. वाल्मिकी आणि सबरीमाता असे आदिवासी युवक युवतीसाठी आश्रमशाळा सुरू करणार असल्याचे यावेळी मंत्री सुदर्शन भगत यांनी सांगितले.

महाकुंभात बुधवारी 

  1. * सायंकाळी साडेपाच वाजता : महाशिवरात्री उत्सव (काकड आरती)
  2. * सकाळी नऊ वाजता : प्रवचन
  3. *सायंकाळी सहा वाजता : सिद्धगिरी गुरूकुलम्च्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम
  4. * रात्री आठ वाजता : सत्संग
     

 

 

Web Title: Kolhapur: Need for the contribution of farmers to double the income of farmers: Sudarshan Bhagat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.