कोल्हापूर : चेष्टामस्करीतून मित्रालाच लोखंडी पाईपने केली मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 05:47 PM2019-01-02T17:47:01+5:302019-01-02T17:50:51+5:30

रात्री जेवणावेळी चेष्टामस्करीतून झालेल्या वादातून मित्राने मित्रालाच लोखंडी पाईपने मारून गंभीर जखमी केल्याचा प्रकार येथील तावडे हॉटेल परिसरात घडला. अनुपकुमार सॅमसन आढाव (वय ३८, रा. कनाननगर, पहिली गल्ली, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. याबाबत दिलीप बापू सलगर (रा. चिंचवाड, ता. करवीर) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Kolhapur: Mitra's iron rods ply with tremors | कोल्हापूर : चेष्टामस्करीतून मित्रालाच लोखंडी पाईपने केली मारहाण 

कोल्हापूर : चेष्टामस्करीतून मित्रालाच लोखंडी पाईपने केली मारहाण 

ठळक मुद्देचेष्टामस्करीतून मित्रालाच लोखंडी पाईपने केली मारहाण शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

कोल्हापूर : रात्री जेवणावेळी चेष्टामस्करीतून झालेल्या वादातून मित्राने मित्रालाच लोखंडी पाईपने मारून गंभीर जखमी केल्याचा प्रकार येथील तावडे हॉटेल परिसरात घडला. अनुपकुमार सॅमसन आढाव (वय ३८, रा. कनाननगर, पहिली गल्ली, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. याबाबत दिलीप बापू सलगर (रा. चिंचवाड, ता. करवीर) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनुपकुमार आढाव हे रविवारी रात्री आपल्या मित्रांसह जेवण करण्यासाठी चारचाकी वाहनातून तावडे हॉटेल परिसरात आले होते. त्यावेळी या मित्रांमधील चेष्टामस्करीचे रूपांतर वादात झाले. त्यातून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

त्याचवेळी अनुपकुमार आढाव हे हा वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करीत होते. त्याच वेळी संशयित दिलीप सलगर याने चारचाकी वाहनातील लोखंडी पाईप आणि जॅकने अनुपकुमारवर हल्ला चढवून, त्याला शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली.

त्यामध्ये अनुपकुमार यांच्या कपाळावर व डोक्यात गंभीर दुखापत झाली. याबाबत मंगळवारी मध्यरात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलीप सलगर याच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे.

Web Title: Kolhapur: Mitra's iron rods ply with tremors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.