कोल्हापूर महामॅरेथॉन सीझन - २ चा रविवारी थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 11:58 AM2019-01-01T11:58:10+5:302019-01-01T11:58:24+5:30

कोल्हापूरकरांसाठी सहा जानेवारीचा दिवस पुन्हा एकदा संस्मरणीय ठरणार आहे. या दिवशी सळसळता उत्साह असणाऱ्या तब्बल चार हजारांहून अधिक धावपटूंच्या सहभागामुळे येथील रस्ते ओसंडून वाहताना दिसणार आहेत. निमित्त असेल ‘मी धावतो... माझ्यासाठी’ असे ब्रीदवाक्य असलेल्या व व्हिंटोजिनो प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्ड बाय माणिकचंद आॅक्सिरिचचे. ​​​​​​​

Kolhapur Mahamerathan Season - 2nd Sunday Thunder | कोल्हापूर महामॅरेथॉन सीझन - २ चा रविवारी थरार

 राजाराम टिंबर मार्केट येथील दिग्गज नेमबाजपटू घडविणारी आॅलिम्पिक टार्गेट शुटिंग अकॅडमीचे नेमबाजीही महामॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत.

Next
ठळक मुद्देकोल्हापूर महामॅरेथॉन सीझन - २ चा रविवारी थरार

कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी सहा जानेवारीचा दिवस पुन्हा एकदा संस्मरणीय ठरणार आहे. या दिवशी सळसळता उत्साह असणाऱ्या तब्बल चार हजारांहून अधिक धावपटूंच्या सहभागामुळे येथील रस्ते ओसंडून वाहताना दिसणार आहेत. निमित्त असेल ‘मी धावतो... माझ्यासाठी’ असे ब्रीदवाक्य असलेल्या व व्हिंटोजिनो प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्ड बाय माणिकचंद आॅक्सिरिचचे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील धावपटूंचा सहभाग, तसेच सर्व संरक्षक दले, पोलीस, होमगार्ड, विशेष दलांतील धावपटूंसाठी विशेष दिले जाणारे बक्षीस ही या स्पर्धेची वैशिष्ट्ये ठरणार आहेत. २१ कि.मी. अर्धमॅरेथॉन, १० कि.मी. पॉवर रन शिवाय फॅमिली व ज्येष्ठ नागरिकांसाठी फन रन आणि ५ कि.मी. अंतराची अशा विविध चार गटांत या अर्धमॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

‘लोकमत’ने यंदा महाराष्ट्रातील पाच शहरांत महामॅरेथॉनचे आयोजन केले आहे. त्यांपैकी नाशिक, औरंगाबाद, येथे झालेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ला तेथील धावपटू, नागरिकांसह परराज्यांतील धावपटूंचाही उदंड व अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. त्यानंतर रविवारी (दि. ६) रोजी सकाळी सहा वाजता पोलीस परेड मैदान येथे होणाºया दुसºया पर्वातील महामॅरेथॉनमध्येही अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे.

कोल्हापुरात रंगणाऱ्या दुसऱ्या पर्वातील महामॅरेथॉन नागरिक आणि खेळाडूंसाठी एक संस्मरणीय अनुभवाचा ठेवा ठरणार आहे. सर्व शहर या निमित्ताने एकत्र यावे, आपापसांत जिव्हाळा निर्माण व्हावा, मैत्री वृद्धिंगत व्हावी, शहरात एकोपा वाढावा हा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ‘लोकमत’ समूहाने ही महामॅरेथॉन आयोजित केली आहे.

शनिवारी बीब कलेक्शन एक्स्पो’

लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना शनिवारी (दि.५) रोजी सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत पोलीस ग्राउंड येथील अलंकार हॉल येथे टी-शर्ट आणि बीब (चेस्ट नंबर), गुडी बॅग वाटप केली जाणार आहे.
ज्या स्पर्धकांनी महामॅरेथॉनसाठी नावनोंदणी केलेली आहे, अशा खेळाडूंना मोबाईलवर आलेले एसएमएस, ई-मेल्स किंवा सभासद नोंदणी शुल्काची पावती सोबत आणावी लागणार आहे.

सोबत आयडेंटिटी फोटो असावा. जे स्पर्धक स्वत: येऊन हे साहित्य घेऊ शकणार नाहीत, त्यांनी मित्र, नातेवाईकांकडे अ‍ॅथॉरिटी पत्र, रिसिट, ई-मेल्स, पाठवून द्यावे. तर ते साहित्य त्यांना देण्यात येईल.

‘एक्स्पो’चे आकर्षण

महामॅरेथॉन स्पर्धेच्या बीब आणि टी-शर्ट वाटपासाठी पोलीस ग्राउंड येथील अलंकार हॉल येथे आयोजित एक्स्पोमध्ये धावपटूंसाठी सेमिनारचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता धावपटूंसाठी एक्स्पो खुले करण्यात येईल. सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार असून, ११.४५ ला फिजिओथेरपिस्ट डॉ. अंजली धमाणे यांचे मार्गदर्शन. १२.३० ला न्यूट्रिशनवर डॉ. प्राची कर्नावट यांचे मार्गदर्शन. दुुपारी ३.०० वा. पेसरबद्दलची माहिती. दुपारी ४.०० वा. मॅरेथॉन मार्गाची माहिती. सायंकाळी ६.०० वा. ‘बीब एक्स्पो’चा समारोप

‘बीब’ म्हणजे काय ?

‘बीब’ म्हणजे धावपटू छातीवर लावतात तो कापडी फलक, कुठल्याही शर्यतीत ‘बीब’ हा आत्मा मानला जातो. धावपटूंना ओळखण्यासाठी बीब क्रमांकाचा वापर होतो.

पेसरची.. टीम धावणार

महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या अ‍ॅथलिट्सचा वेग वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणारा घटक म्हणजे ‘पेसर’ होय. अ‍ॅथलिट्स असलेले हे पेसर निश्चित केलेल्या एका ठरावीक टप्प्यापर्यंत धावपटूंना वेगात घेऊन जाणे, त्यांना विक्रम रचण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यानंतर स्वत: माघार घेणे, अशी भूमिका करतात. अशा ‘पेसर’ची टीम कोल्हापुरातील व्हिंटोजिनो प्रस्तुत व पॉवर्ड बाय माणिकचंद आॅक्सिरिच ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणार आहेत.

मॅरेथॉन स्पर्धेत पेसरसोबत धावण्याची क्रेझ वाढत आहे. पेसरच्या टीमसोबत धावण्याचे अनेक फायदे आहेत. नवीन अ‍ॅथलिट्सना शर्यत पूर्ण करण्याचा अनुभव नसतो; त्यामुळे काही वेळेला काही अ‍ॅथलिट्स सुरुवातीलाच आपला वेग वाढवतात आणि नंतर शर्यत पूर्ण करताना त्यांची दमछाक होते; पण पेसरसोबत धावताना भलेही सुरुवात काहीशी धिम्या गतीची झाली असेल; पण हे पेसर हळूहळू अ‍ॅथलिट्सचा वेग वाढवीत नेतात आणि अपेक्षित वेळेत शर्यत पूर्ण करण्याची संधी अ‍ॅथलिट्सला मिळते. त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षाही अधिक वेगाने अंतर कापण्याची क्षमता त्यांच्यात असते. अपेक्षित वेळेत शर्यत पूर्ण करण्याची संधी अ‍ॅथलिट्सना मिळते
 

 

शहरातील अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या ‘लोकमत’ ने नागरिकांच्या आरोग्यासंबंधी एक पाऊल पुढे टाकून ‘लोकमत महामॅरेथॉन’ची सुरुवात गेल्या वर्षी केली होती. यंदाही दुसऱ्या पर्वात सहा जानेवारीला मॅरेथॉन महोत्सव होत आहे. या महोत्सवाची आस जिल्ह्यासह परराज्यातील धावपटूंसह सर्वसामान्य नागरिकांनाही आहे. अशा प्रकारचा आरोग्याशी संबंधित महोत्सव होत आहे. यात आम्हीही लोकमतबरोबर खांद्याला खांदा लावून सहभागी झालो आहोत. याचा आम्हाला अभिमान आहे. असेच कार्य लोकमत समूहाकडून घडो आणि कोल्हापूरकरांचे स्वास्थ्य आणखी चांगले राहो.
- चिन्मय कडेकर,
संचालक हॉटेल केट्री

 



लोकमत समूहाने महामॅरेथॉनच्या रूपाने राज्यातील लहानग्यांपासून ते वयाची सत्तरी गाठलेल्या नागरिकांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. आजकाल लहान मुले मोबाईल गॅझेटवर खेळत आहेत; त्यामुळे चांगली सुदृढ पिढी निर्माण होणार नाही; त्यामुळे लोकमतचा हा उपक्रम खरोखरच उद्याची पिढी चांगली घडविण्यासाठी उत्तम पर्याय देणारा आहे. आरोग्य चांगले, तर सर्व काही ठीक असे म्हणता येईल; त्यामुळे आजच्या पिढीला मैदानी खेळांकडे वळविण्यासाठी लोकमत महामॅरेथॉन चांगली पर्वणी आहे. मीही सहभागी झालो आहे. ज्यांना सहभागी होता आले नाही. त्यांनी रविवारी (दि. ६) सकाळी सहभागी झालेल्या धावपटूंना चिअरअप करण्यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहावे. जेणेकरून मॅरेथॉन चळवळीस पाठिंबा लाभेल.
- विश्वविजय खानविलकर,
अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन


 

 

Web Title: Kolhapur Mahamerathan Season - 2nd Sunday Thunder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.