कोल्हापूर : महादेवराव महाडिक थेट बावड्यात, सतेज पाटील, नेजदारांच्या घरी दिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 11:38 AM2018-09-14T11:38:59+5:302018-09-14T19:24:00+5:30

आमदार सतेज पाटील समर्थकांनी तसेच संदीप नेजदार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन, महादेवराव महाडिक यांना बावड्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिला. ही बातमी वाचून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी थेट आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली, पण त्यांची भेट न झाल्याने त्यांनी आपली गाडी नंतर नेजदार यांच्या घरी वळवली.

Kolhapur: Mahadevrao Mahadik presented directly at Bawwadia, Satej Patil, home of Nizar | कोल्हापूर : महादेवराव महाडिक थेट बावड्यात, सतेज पाटील, नेजदारांच्या घरी दिली भेट

कोल्हापूर : महादेवराव महाडिक थेट बावड्यात, सतेज पाटील, नेजदारांच्या घरी दिली भेट

googlenewsNext
ठळक मुद्देमहादेवराव महाडिक थेट बावड्यातसतेज पाटील, नेजदारांच्या घरी दिली भेटनेजदारांचे आव्हान स्वीकारून महाडिकच सतेज यांच्या दारी

कोल्हापूर : गेली दहा वर्षे ज्यांच्याशी टोकाचे राजकीय वैर आहे, अशा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या कसबा बावड्यातील निवासस्थानी शुक्रवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी चक्क धडक दिली.

आमदार पाटील तिथे नसल्याने त्यांनी कसबा बावड्यातीलच हनुमान गल्लीतील नेजदार यांच्या वाड्यात जाऊन डॉ. संदीप व विश्वास नेजदार यांची भेट घेतली व कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संपर्क सभेत विश्वास नेजदार यांना झालेल्या मारहाणीचा प्रकार चुकीचा असल्याचे सांगून दिलगिरी व्यक्त केली. 

महाडिक यांनी बावडयात येऊन दाखवावे, असा धमकीवजा इशारा राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांनी गुरुवारी (दि.  १३) दिला होता. त्यावरून हे सगळे रामायण घडले. महाडिक यांनीच त्याबद्दल असे सांगितले, ‘मी गुरुवारी सकाळी घरी ‘लोकमत’ वाचत होतो; त्यामध्ये महाडिकांना बावड्यात फिरू देणार नसल्याची बातमी वाचली.

लोकशाहीत असे कोण कुणाला फिरू देणार नाही, असे म्हणत असेल तर ते योग्य नाही, असे वाटल्याने मी गाडी काढली आणि बावड्याकडे निघालो. नेजदार यांना भेटायचे ठरविले होते; परंतु नेजदार यांचे गुरू बंटी पाटील असल्याने अगोदर त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या दारातूनच ‘बंटी पाटील आहेत का?’ अशी विचारणा केल्यावर घरातील कुणीतरी ‘साहेब पुण्याला गेले आहेत,’ असे सांगितले. त्यामुळे मी गाडी मागे घेऊन बाहेर पडलो व नेजदार यांच्या घरी गेलो.

माझा जन्म सांगली जिल्ह्यातील असला तरी मला वाढविले, बळ दिले ते कोल्हापूर जिल्ह्याने. मी लष्करात काम केलेला व पैलवानकी केलेला माणूस आहे. आजपर्यंतचे राजकारण एकट्याच्या बळावर केले आहे. त्यामुळे या शहरात मला कुणी फिरू देणार नसेल तर मग माझे जिणे व्यर्थ आहे. नेजदार हे राजाराम कारखान्याचे दहा वर्षे अध्यक्ष होते.

माझ्याबरोबर त्यांनी काम केले आहे. अशा ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या अंगावर धावून जाणे हे घडायला नको होते. त्यामुळे जेव्हा हे घडले तेव्हाच मी त्यांच्या घरी जाणार होतो; परंतु त्या दिवशी वातावरण तप्त असल्याने थांबलो. मी त्यांच्या घरी जाऊन झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली व ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनाही दिलगिरी व्यक्त करण्यासाठी भेटायला पाठवून देतो, असे सांगून आलो, असे महाडिक यांनी सांगितले.

‘गोकुळ’ची सर्वसाधारण सभा येत्या २१ सप्टेंबरला होत आहे. त्यामध्ये संघ मल्टिस्टेट करण्याचा ठराव आहे. त्याला आमदार सतेज पाटील यांनी तीव्र विरोध केला आहे. सभेच्या अगोदर सत्तारूढ संचालक प्रत्येक तालुक्यात जाऊन संपर्क सभा घेतात व संघाच्या कारभाराबद्दल माहिती देतात.

अशा सभेत संघ मल्टिस्टेट करण्यात सभासदांनी विरोध केला आहे. ही सभा संघाच्या ताराबाई पार्कातील मुख्यालयात होणार आहे. तिथे जागा अडचणीची असल्याने सभा तिथे घेण्यासही आमदार पाटील गटाचा विरोध आहे.

या घडामोडी असताना नेजदार यांना संघाचे अध्यक्ष विश्र्वास पाटील यांच्या गावांतील समर्थकांनी मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला होता व संपर्क सभेत ही स्थिती तर प्रत्यक्ष सर्वसाधारण सभेत २१ तारखेला काय होणार, याबद्दल सभासदांच्या मनांतही भीती आहे. परंतु महाडिक यांनी नेजदार यांची भेट घेतल्याने हा ताण काही प्रमाणात सैल झाला आहे.

बावडेकरांचा झटका अन् सिंघम...!

कट्टर राजकीय वैरी असणाºया नेत्याच्या घरी जाण्याच्या महाडिक यांच्या या भूमिकेने जिल्ह्यात खळबळ उडवून दिली. त्यावरून दोन्ही गटांनी सोयीस्कर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बावडेकरांच्या झटक्यापुढे कसे नमले, महाडिकांना शेवटी बावड्यात येऊन दिलगिरी व्यक्त करावी लागली व हा त्यांचा सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया सतेज पाटील गटाने व्यक्त केली; तर महाडिक हे सिंघम आहेत. ते गाडीतून एकटे जाऊन  बावड्यात चार फेºया मारून आले; त्यांना अडविण्याची कुणांत हिंमत नाही, असे मेसेज महाडिक समर्थकांनी शेअर केले.

संघ मालकीचा आहे का?

गोकुळ सभेत प्रश्न विचारल्यावर नेजदार यांच्याबद्दल जो प्रकार घडला त्याबद्दल त्यांच्या पुतण्यांनी महाडिक यांच्याकडे भेटीदरम्यान संतप्त शब्दांत नाराजी व्यक्त केली. घडला प्रकार आम्हांला नेजदार यांनी कळू दिला नाही अन्यथा आम्हीही ज्यांनी हा प्रकार केला त्यांना घरातून शोधून आणले असते, असे सुनावले. संघ काय विश्वास पाटील यांच्या मालकीचा आहे का, अशीही विचारणा या भेटीदरम्यान नेजदार कुटुबीयांनी केली. विश्र्वास पाटील यांनी मूर्खपणा केल्याची टिप्पण्णी यावेळी महाडिक यांनी केली. 

पाहा व्हिडीओ -

Web Title: Kolhapur: Mahadevrao Mahadik presented directly at Bawwadia, Satej Patil, home of Nizar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.