कोल्हापूर :चिमासाहेबांचा इतिहास युवा पिढीला प्रेरणादायी : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 05:09 PM2018-05-14T17:09:47+5:302018-05-14T17:09:47+5:30

क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज यांना अभिवादन व ‘सीपीआर’समोरील क्रांती उद्यान लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

Kolhapur: History of Chimasaheb Inspiring young generation: Chandrakant Patil | कोल्हापूर :चिमासाहेबांचा इतिहास युवा पिढीला प्रेरणादायी : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर :चिमासाहेबांचा इतिहास युवा पिढीला प्रेरणादायी : चंद्रकांत पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर :चिमासाहेबांचा इतिहास युवा पिढीला प्रेरणादायी : चंद्रकांत पाटीलक्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज यांना अभिवादन; क्रांती उद्यान लोकार्पण सोहळा

कोल्हापूर : क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज यांचा रक्तरंजित इतिहास साहित्यातून विकसित करून तो लोकांपर्यंत पोहोचविल्यास आजच्या युवा पिढीला निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे उद्गार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.

क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज यांना अभिवादन व ‘सीपीआर’समोरील क्रांती उद्यान लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी आमदार अमल महाडिक हे होते. क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज सांस्कृतिक मंडळ, केएसबीपी, सिटीझन फोरम आणि अकबर मोहल्ला सामाजिक मंडळ यांच्या संयुक्ततेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, क्रांतिवीर चिमासाहेब महाराज यांच्या क्रांतीकारक आठवणी सतत जागे ठेवण्याचे काम या उद्यानातून सुरू होते. चिमासाहेब महाराज यांनी गाजविलेला इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.

शिक्षणमंत्र्याशी बोलून चिमासाहेब यांचा रक्तरंजित इतिहास पाठ्यपुस्तकात घेण्याबाबत चर्चा करू त्याशिवाय तो इतिहास साहित्यातून आजच्या युवापिढीपर्यंत पोहोचविल्यास तो खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरेल. शहराच्या कॉलन्यांतील आरक्षित खुल्या जागेत उद्याने विकसित करण्यासाठी ‘केएसबीपी’ नेहमीच आपल्यासोबत आहे असेही ते म्हणाले.



प्रस्ताविक वैभवराज भोसले यांनी केले. तर स्वागत प्रसाद जाधव यांनी केले. यावेळी आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, स्थायी समितीचे सभापती आशिष ढवळे, दै. ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, नगरसेविका महेजबीन सुभेदार, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप जाधव, सूर्यराज भोसले, आदी उपस्थित होते.

राजकारण नको, समाजकारण करा.

‘केएसबीपी’वर पैसे मिळवित असल्याचा आक्षेप होत होता. महापालिकेकडे प्रस्ताव ठेवल्यानंतर काहींना त्याचा आर्थिक वास आला, त्यांनी विरोध केला. पण ‘केएसबीपी’ संस्था शांत बसलेली नाही, त्यांनी विकसनशीलतेचा ध्यास घेतला आहे. राजकारण बाजूला ठेवून समाजकारणासाठी विकास स्विकारा, असेही आवाहन मंत्री पाटील यांनी केले.

आता मुलांसाठी मोफत सहल

‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ ही पर्यटनवाढीसाठी संकल्पना सत्यात उतरली. आता शहरातील ८ ते १५ वयोगटातील १०० विद्यार्थ्यांसाठी शहरातील दुर्लक्षित प्रेरणादायी ठिकाणे माहिती देण्याची एक दिवसांची सहल डिसेंबरपासून सुरू करणार असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी यावेळी जाहीर केली.
 

 

Web Title: Kolhapur: History of Chimasaheb Inspiring young generation: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.