जिल्हा ब्राह्मण संघाचा मराठा आरक्षणास पाठिंबा 

By विश्वास पाटील | Published: November 1, 2023 10:11 AM2023-11-01T10:11:35+5:302023-11-01T10:12:56+5:30

सकाळी सर्वानी १०.३० वाजेपर्यंत बिनखांबी गणेश मंदिराजवळ एकत्र जमून पुढे जाऊ या असे आवाहन करण्यात आले आहे.

kolhapur district brahmin sangh support maratha reservation | जिल्हा ब्राह्मण संघाचा मराठा आरक्षणास पाठिंबा 

जिल्हा ब्राह्मण संघाचा मराठा आरक्षणास पाठिंबा 

विश्वास पाटील, कोल्हापूर : आरक्षणासाठी राज्यभर  सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनास कोल्हापुरातील ब्राह्मण महासंघाने बुधवारी पाठींबा जाहीर केला. कोल्हापुरातील दसरा चौकात सुरू असलेल्या साखळी उपोषणात ब्राह्मण समाजाचे कार्यकर्ते आज सहभागी होत आहेत. 

राज्यात चालु असलेल्या मराठा आरक्षण बाबत दसरा चौकात आरक्षणासाठी  साखळी उपोषण चालु आहे. तरी या उपोषणाला कोल्हापूर जिल्ह्यातील  सर्व ब्राह्मण संघटानाकडुन आज  सकाळी ११ वाजता पठिंबा द्यायचा आहे... 

सकाळी सर्वानी १०.३० वाजेपर्यंत बिनखांबी गणेश मंदिराजवळ एकत्र जमून पुढे जाऊ या असे आवाहन करण्यात आले आहे 

कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण संघ, समस्त ब्राह्मण संघ, बहूद्देशीय ब्राह्मण संघ, सारस्वत विकास मंडळ, ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम, कोल्हापूर चित्पावन ब्राह्मण संघ, आखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, वेद चॅरिटेबल ट्रस्ट, ब्राह्मण बिझनेस फोरम, कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहीत संघ, आंतराष्ट्रीय ब्राह्मण परिषद, कर्‍हाडे ब्राह्मण संघ, कोल्हापूर, श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपुजक मंडळ आदी संस्था संघटनांनी एकत्रितपणे ही भूमिका जाहीर केली आहे.

Web Title: kolhapur district brahmin sangh support maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.