कोल्हापूर : बॅँकेच्या सील मिळकती ताब्यात घेणाऱ्या पाचजणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 04:23 PM2018-09-15T16:23:27+5:302018-09-15T16:25:58+5:30

सातार्‍यातील कर्नल थोरात सहकारी बॅँकेने सील केलेल्या शाहूपुरी येथील फ्लॅट व दुकानगाळ्यांचा जबरदस्तीने ताबा घेणार्‍या पाचजणांविरुद्ध शुक्रवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अख्तर मुल्लाणी, जावेद मुल्लाणी, अन्वर मुल्लाणी, सलीम मुल्लाणी, इकबाल मुल्लाणी (रा. सर्व शाहूपुरी)अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

Kolhapur: Crime against five people who took possession of seal seal of property | कोल्हापूर : बॅँकेच्या सील मिळकती ताब्यात घेणाऱ्या पाचजणांविरुद्ध गुन्हा

कोल्हापूर : बॅँकेच्या सील मिळकती ताब्यात घेणाऱ्या पाचजणांविरुद्ध गुन्हा

Next
ठळक मुद्दे बॅँकेच्या सील मिळकती ताब्यात घेणाऱ्या पाचजणांविरुद्ध गुन्हाकोल्हापुरातील फ्लॅट, दुकानगाळ्यांचा जबरदस्तीने तोडले कुलूप

कोल्हापूर : सातार्‍यातील कर्नल थोरात सहकारी बॅँकेने सील केलेल्या शाहूपुरी येथील फ्लॅट व दुकानगाळ्यांचा जबरदस्तीने ताबा घेणार्‍या पाचजणांविरुद्ध शुक्रवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अख्तर मुल्लाणी, जावेद मुल्लाणी, अन्वर मुल्लाणी, सलीम मुल्लाणी, इकबाल मुल्लाणी (रा. सर्व शाहूपुरी)अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी की, सातारा येथील कर्नल थोरात सहकारी बॅँकेने कर्जाची परतफेड न केल्याने कोल्हापुरातील शाहूपुरीतील फ्लॅट व दुकानगाळे सील केले होते; परंतु अख्तर मुल्लाणी, जावेद मुल्लाणी, अन्वर मुल्लाणी, सलीम मुल्लाणी, इकबाल मुल्लाणी यांनी जबरदस्तीने या ठिकाणी येऊन कुलूप तोडून या मिळकतींचा ताबा घेतला.

याबाबत बॅँकेचे अधिकारी दत्तात्रय सोपानराव शिंदे (वय ४५, रा. सातारा) यांनी याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
 

 

Web Title: Kolhapur: Crime against five people who took possession of seal seal of property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.