कोल्हापूर : पदवी प्रमाणपत्रे बदलून द्यावीत, शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाची मागणी ; कुलगुरूंना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 05:08 PM2018-04-11T17:08:37+5:302018-04-11T17:08:37+5:30

पदवी प्रदान समारंभावेळी विद्यार्थ्यांना सदोष छपाईची पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली. या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे रंगीत आणि लॅमिनेटेड स्वरुपात देण्यात नव्याने देण्यात यावीत अशी मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) केली आहे. या मागणीचे पत्र सुटाने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना दिले आहे.

Kolhapur: Change of degree certificate, demand for Shivaji University teacher team; Letter to the Vice Chancellor | कोल्हापूर : पदवी प्रमाणपत्रे बदलून द्यावीत, शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाची मागणी ; कुलगुरूंना पत्र

कोल्हापूर : पदवी प्रमाणपत्रे बदलून द्यावीत, शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाची मागणी ; कुलगुरूंना पत्र

googlenewsNext
ठळक मुद्देपदवी प्रमाणपत्रे बदलून द्यावीतशिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाची मागणी कुलगुरूंना पत्र

कोल्हापूर : पदवी प्रदान समारंभावेळी विद्यार्थ्यांना सदोष छपाईची पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली. या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे रंगीत आणि लॅमिनेटेड स्वरुपात देण्यात नव्याने देण्यात यावीत अशी मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) केली आहे. या मागणीचे पत्र सुटाने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना दिले आहे.

घाईगडबडीमुळे कृष्णधवल स्वरुपातील प्रमाणपत्रांवर काही मजकूर अस्पष्ट असून छायांकित प्रत सुद्धा अस्पष्ट स्वरुपात येते. पदवी प्रमाणपत्र हे दीर्घकाळ ठेवायचा दस्तऐवज आहे.

विद्यापीठाने पदवी प्रदान समारंभावेळी दिलेले प्रमाणपत्र भविष्यात अधिक अस्पष्ट होण्याची शक्यता आहे. परदेशातील शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी ही कृष्णधवल स्वरुपातील प्रमाणपत्रे अयोग्य आहेत. कारण, लॅमिनेशन नसल्याने त्या प्रमाणपत्रांमध्ये फेरफार करणे सुलभ बनते.

या सर्व बाबींचा विचार करता विद्यार्थ्यांना दिलेली पदवीप्रमाणपत्रे बदलून देणे आवश्यक आहे. काही प्रमाणपत्रांमध्ये चुका झाल्या आहेत. तेव्हा सर्व पदवीप्रमाणपत्रे परत घेवून त्याऐवजी रंगीत व लॅमिनेशन केलेली नवी प्रमाणपत्रे देण्यात यावी, अशी मागणी सुटाने केली असल्याची माहिती सुटाचे उपाध्यक्ष प्रा. अरुण पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.
 

 

Web Title: Kolhapur: Change of degree certificate, demand for Shivaji University teacher team; Letter to the Vice Chancellor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.