Kolhapur: हमालाने परस्पर विकली कांद्याची पोती; चोरट्यास अटक, गुन्ह्यात आणखी दोन साथीदारांचा समावेश

By उद्धव गोडसे | Published: February 1, 2024 04:31 PM2024-02-01T16:31:52+5:302024-02-01T16:34:01+5:30

दोन दिवसांची पोलिस कोठडी

Hamal mutually sold sacks of onions; Thief arrested in kolhapur | Kolhapur: हमालाने परस्पर विकली कांद्याची पोती; चोरट्यास अटक, गुन्ह्यात आणखी दोन साथीदारांचा समावेश

Kolhapur: हमालाने परस्पर विकली कांद्याची पोती; चोरट्यास अटक, गुन्ह्यात आणखी दोन साथीदारांचा समावेश

कोल्हापूर : राजर्षी शाहू मार्केट यार्डमध्ये हमालीचे काम करताना परस्पर कांद्याची पोती दुस-याच व्यापाऱ्यांना विकून कांदा चोरी करणाऱ्या हमालास शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संजय गणपती लोहार (वय ४५, रा. बांदिवडे, ता. पन्हाळा) असे कांदा चोर हमालाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील २० हजार रुपये किमतीची कांद्याची २० पोती हस्तगत केली. या गुन्ह्यात त्याच्या आणखी दोन साथीदारांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मार्केट यार्डमधील कांदा व्यापारी बन्शीलाल अँड सन्स, अनुप रुपमल पोपटाणी आणि दगडू धोंडीराम जानकर यांच्या दुकानात उतरवली जाणारी २० कांद्याची पोती चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. याबाबत २८ जानेवारीला शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. फिर्यादींकडून माहिती घेतल्यानंतर काही हमालांनीच कांद्याची पोती लांबवली असावित, असा पोलिसांना संशय आला.

त्यानुसार संशयित संजय लोहार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. ट्रकमधून पोती उतरवतानाच त्याने मार्केट यार्डातील दुसऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानात २० पोती पोहोचवली. या गुन्ह्यात त्याच्या आणखी दोन साथीदारांचा समावेश असून, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 

लोहार गेल्या दहा वर्षांपासून मार्केट यार्डमध्ये हमालीचे काम करीत आहे. न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. सहायक फौजदार संदीप जाधव यांच्यासह कॉन्स्टेबल मिलिंद बांगर, रवी आंबेकर, बाबा ढाकणे, महेश पाटील, विकास चौगुले, लखनसिंग पाटील, शुभम संकपाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Hamal mutually sold sacks of onions; Thief arrested in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.