कोल्हापूर-मुंबई विमानाचे महिन्यानंतर उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:55 AM2018-07-30T00:55:43+5:302018-07-30T00:55:49+5:30

Flight after month of Kolhapur-Mumbai flight | कोल्हापूर-मुंबई विमानाचे महिन्यानंतर उड्डाण

कोल्हापूर-मुंबई विमानाचे महिन्यानंतर उड्डाण

Next
<p>कोल्हापूर : तांत्रिक कारणामुळे एअर डेक्कन कंपनीने थांबविलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा रविवारपासून सुरू झाली. एक महिन्यानंतर कोल्हापुरातून विमानाने उड्डाण (टेकआॅफ) केले. कंपनीतर्फे पूर्वीच्या वेळापत्रकानुसार आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि रविवारी सेवा पुरविण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा एअर डेक्कन कंपनीने १७ एप्रिलपासून सुरू केली. तिला कोल्हापुरातून चांगला प्रतिसाद मिळाला. तांत्रिक कारणामुळे २६ जूनपासून उड्डाणे रद्द केली. कंपनीकडून पहिल्यांदा १० जून आणि त्यानंतर १५ जूनला सेवा सुरू होणार असल्याचे खासदार महाडिक यांना सांगण्यात आले; पण तांत्रिक कारणामुळे सेवा सुरू झाली नाही.
याबाबत प्रवाशांसह कोल्हापूरकरांतून नाराजी व्यक्त झाली. त्यावर खासदार संभाजीराजे आणि खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, एअर डेक्कन कंपनी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यात खासदार संभाजीराजे यांनी २७ जुलैला ‘एअर डेक्कन’समवेत चर्चा केली. त्यावर कंपनीने रविवार (दि. २९) पासून मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू करीत असल्याचे पत्र त्यांना दिले. यानुसार रविवारपासून विमानसेवा सुरू झाली. दुपारी अडीच वाजता विमान हे कोल्हापूर विमानतळावर आले. दुपारी तीन वाजता येथून मुंबईच्या दिशेने त्याने उड्डाण केले. विमानसेवा पूर्ववत सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

कोल्हापूर-मुंबई सेवा आठवडाभर सुरू राहण्यासाठी अन्य काही कंपन्यांशी चर्चा करणार आहे. त्यासह केंद्रीय विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेणार आहे.
- खासदार धनंजय महाडिक

मी केलेल्या मागणीनंतर एअर डेक्कन कंपनीने रविवारपासून विमानसेवा सुरू करून शब्द पाळल्याचा आनंद आहे. ही विमानसेवा नियमितपणे सुरू ठेवावी, इतकी अपेक्षा आहे.
- खासदार संभाजीराजे

Web Title: Flight after month of Kolhapur-Mumbai flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.