माजी सैनिकांच्या ‘कल्याणा’ची आबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:45 AM2018-10-08T00:45:45+5:302018-10-08T00:45:49+5:30

Ex-soldier's welfare of Kalyana | माजी सैनिकांच्या ‘कल्याणा’ची आबाळ

माजी सैनिकांच्या ‘कल्याणा’ची आबाळ

googlenewsNext

दीपक जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भारतमातेच्या रक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या राज्यातील अडीच लाखांहून अधिक माजी सैनिकांच्या कल्याणाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे; कारण राज्यातील ३७ जिल्ह्यांचा कारभार कसाबसा १३ अधिकारीच सांभाळत आहेत; त्यामुळे एकाच अधिकाºयाकडे पाच-पाच जिल्ह्यांचा कार्यभार आहे. सैनिकांच्या कल्याणाचा उदोउदो करणारे सरकार मात्र त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार नाही.
पुरेसा पगार व आवश्यक सोईसुविधा मिळत नसल्याने कोणी या पदावर काम करण्यास पुढे येत नसल्याचे चित्र आहे. हा विभाग माजी सैनिक कल्याण मंत्र्यांकडे येतो. म्हणून याबाबत मंत्री संभाजीराव निलंगेकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
देशाच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या जवानांचे कुटुंबीय व देशसेवेतील माजी सैनिकांच्या कल्याणासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात; त्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आहे; परंतु गेली अनेक वर्षे फक्त १३ अधिकाºयांकडेच संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांचा कार्यभार आहे. कोल्हापूरला मेजर सुभाष सासने हे काम पाहतात; परंतु त्यांच्याकडे कोल्हापूरशिवाय सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांचा कार्यभार आहे. यापूर्वी त्यांच्याकडे सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड व परभणी या जिल्ह्यांचाही पदभार होता.
एका अधिकाºयाला एवढे जिल्हे पालथे घालताना जीव मेटाकुटीस येत असे. पुण्यातील अधिकाºयांसाठी तर व्हॅन आहे व त्यांच्याकडे नांदेडचा पदभार आहे. त्यांना इतक्या लांब व्हॅनमधून जाताना अडचणीचे होते. अशीच स्थिती बहुतांश जिल्ह्यांत आहे. प्रत्येक जिल्ह्यास अधिकारी नसल्याने सैनिकांच्या अडचणी सोडविण्यावरही परिणाम होतो.
या पदासाठी सैन्यातून मेजर, कर्नल या पदांवरून निवृत्त झालेले अधिकारी पात्र असतात. त्यांना सैन्यातून निवृत्त होताना चांगला पगार असतो. पेन्शनही चांगली मिळते आणि राज्य सरकार मात्र त्यांना जास्तीत जास्त २७ ते ४० हजार रुपयेच पगार देते. लष्करातील अधिकारी म्हणून त्यांना असणारा मानसन्मान मिळत नाही, १0-१0 वर्षे काम केले, तरी पदोन्नती होत नाही; त्यामुळे या पदावर काम करण्यास कोण लष्करातील अधिकारी यायला तयार नाहीत, असेही चित्र आहे.

सैनिक कल्याण अधिकाºयांच्या कामाचे स्वरूप
माजी सैनिकांच्या कल्याणार्थ असलेल्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविणे व त्यांना व्यक्तिगत लाभ मिळवून देणे. पाल्यांसाठी शिष्यवृत्ती मिळवून देणे.
दृष्टिक्षेपात सैनिकांची संख्या
राज्यातील एकत्रित माजी सैनिक : २ लाख ५० हजार
कोल्हापूर जिल्ह्यात : १७ हजार ५००.

Web Title: Ex-soldier's welfare of Kalyana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.