शरीराने साथ सोडली तरीही ‘ती’ नाही हारली! प्रीती पटवा यांचा संघर्ष : ‘मस्कुलर डिस्ट्रॉफी’वर मात करीत शिक्षणात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:33 AM2018-03-08T00:33:02+5:302018-03-08T00:33:02+5:30

इचलकरंजी : चालता येत नसल्याने गेल्या सतरा वर्षांपासून व्हीलचेअरसोबत मर्यादित आयुष्य असतानाही जीवनातील अनेक अडचणींचा सामना करीत ‘त्या’ जीवन जगतात... जीवनावर प्रेम करतात...लढतात...पडतात...पुन्हा उठतात.

Even if the body is left with 'no' no! Preeti Patwa's struggle: Topping out 'Muskalar Dstrophyi' | शरीराने साथ सोडली तरीही ‘ती’ नाही हारली! प्रीती पटवा यांचा संघर्ष : ‘मस्कुलर डिस्ट्रॉफी’वर मात करीत शिक्षणात अव्वल

शरीराने साथ सोडली तरीही ‘ती’ नाही हारली! प्रीती पटवा यांचा संघर्ष : ‘मस्कुलर डिस्ट्रॉफी’वर मात करीत शिक्षणात अव्वल

Next

अतुल आंबी ।
इचलकरंजी : चालता येत नसल्याने गेल्या सतरा वर्षांपासून व्हीलचेअरसोबत मर्यादित आयुष्य असतानाही जीवनातील अनेक अडचणींचा सामना करीत ‘त्या’ जीवन जगतात... जीवनावर प्रेम करतात...लढतात...पडतात...पुन्हा उठतात...जगण्यावर प्रेम करीत राहतात... अपंग असूनही आपले वकिलीचे शिक्षण अव्वल दर्जाने पूर्ण करून त्यानंतर सेट-नेट परीक्षेतही उज्ज्वल यश संपादन करणाºया अ‍ॅड. प्रीती प्रकाश पटवा यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी...

इचलकरंजीत राहणाºया प्रीती या एका सधन मारवाडी कुटुंबातील. सर्व काही त्यांच्यादृष्टीने चांगले चालले होते. बारावीत कलाशाखेत त्या इचलकरंजी केंद्रात प्रथम आल्या. त्यानंतर बी.ए. इंग्लिशला प्रवेश घेतला. एकीकडे अभ्यास, तर दुसरीकडे महाराष्टÑभर वक्तृत्व स्पर्धेतून यश असा प्रवास चालू होता. नंतर बी.ए. इंग्लिशमध्ये विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत त्या आल्या.

बी.ए. ला असताना जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा गाजवत होत्या. सांगलीला कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी एन. एस. लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, ते अनेक स्वप्न मनाशी बाळगून. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. अचानक त्यांना चालायला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी अस्थितज्ज्ञांना दाखविले. तपासणीनंतर कळले की, स्नायू व नसांच्या कमजोरीमुळे त्यांना हा त्रास होत आहे; पण त्याच्या कारणाचे निदान होऊ शकले नाही आणि मग तेथून सुरू झाला दवाखान्याचा प्रवास. सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई व बंगलोर अशा सगळ्यांच ठिकाणचे तज्ज्ञ डॉक्टर झाले; पण कशाचाच उपयोग झाला नाही.

एक दिवस त्यांना लक्षात आले, आपल्याला बसची पायरी चढायला त्रास होतोय. मग पुन्हा जाणवलं, पायातली शक्तीच हरवल्यासारखी वाटतेय. असंख्य चाचण्या, ढीगभर औषधे, पण निदान मात्र होत नव्हते. साधारणत: डॉक्टरांनी हा मस्कुलर डिस्ट्रॉफी आजार असल्याचे निदान केले. म्हणजे आता हळूहळू संपूर्ण शरीरातील शक्ती कमी कमी होणार होती आणि ते रोखण्यासाठी ठोस उपचारच नव्हता. सुरुवातीला त्या खूप खचल्या. वाटलं सगळंच संपल; पण त्यांचे आई-वडील,भाऊ व मित्र-मैत्रिणींनी त्यांना खूप आधार दिला.त्यामुळे त्यांनी पुन्हा लढायचे ठरवले आणि त्यात त्यांना खूप मोठी साथ मिळाली ती त्यांच्या कुटुंबाची. त्यांनी कायद्याचा अभ्यास पुन्हा जोमाने सुरू केला. खूप अडचणींचा सामना करत त्यांनी सन २००४ साली आपले एलएल.बी.चे शिक्षण फर्स्ट क्लास मिळवत विद्यापीठात तिसºया क्रमांकाने पूर्ण केले.

त्यानंतर सन २००६ साली फर्स्ट क्लासमध्येच विद्यापीठात द्वितीय क्रमांकाने एलएल.एम.चे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या शैक्षणिक व इतर उपलब्धीसाठी त्यांना शिवाजी विद्यापीठाने सन २००६ सालच्या राष्टÑपती पुरस्काराने सन्मानित केले. त्यांची वक्तृत्व शैली, कायद्याचे ज्ञान याच्या जोरावर त्यांची शिवाजी विद्यापीठात एलएल.एम. विभागासाठी असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली. तसेच त्यांना सन २००७ साली महाराष्टÑाचे राज्यपाल यांच्याकडून मुंबई राजभवन येथे चान्सलर्स अवॉर्ड देऊन सन्मानित केले. इकडे नियतीचा पाठलाग सुरू होता. आजार बळावल्याने त्यांना फक्त चार पावलं चालता येत होती, ते पण आधार धरून. त्यामुळे व्हीलचेअर त्यांची सोबती झाली होती. त्यांनी नोकरी सोडली व त्या इचलकरंजीला परत आल्या. येथे त्यांनी लॉचे क्लासेस सुरू केले. त्याबरोबर कंपनी सेक्रेटरी, सी. ए. तसेच जज्जच्या परीक्षेसाठी देखील त्या क्लासेस घेतात.

आता त्यांचा आजार वाढल्याने त्यांना हातात पुस्तके व पेनही पकडता येत नाही. त्या आता सर्वस्वी दुसºयावर अवलंबून आहेत. तरीही विश्वास बसणार नाही, एवढ्या जिद्दीने त्या आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहेत. कायद्याच्या पाच वर्षांच्या कोर्समध्ये असलेले ४४ विषय त्या स्वत: तन्मयतेने शिकवितात. सध्या कायद्याच्या सर्व विषयांच्या नोट्स प्रकाशित करण्याचा त्यांचा विचार आहे आणि त्यावर त्यांचे काम चालू आहे. शरीर साथ देत नसताना ही एवढी स्वप्ने बाळगणाºया, एवढी मेहनत घेणाºया, सतत हसतमुख असणाºया जिद्दीला सलाम.

व्हीलचेअरवर लॅपटॉपवर अभ्यासात मग्न असलेल्या प्रीती पटवा.

Web Title: Even if the body is left with 'no' no! Preeti Patwa's struggle: Topping out 'Muskalar Dstrophyi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.