उद्योजकाचा बंगला फोडला, रोकडसह दहा तोळे सोन्याचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 06:36 PM2019-03-05T18:36:08+5:302019-03-05T18:37:27+5:30

कसबा बावडा शासकीय धान्य गोडाऊन रमणमळा परिसरातील उद्योजकाच्या बंद बंगल्याच्या मुख दरवाजाचे कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी ७० हजार रोकड, दहा तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे पावणेचार लाखाचा ऐवज लंपास केल्याचे मंगळवारी दूपारी उघडकीस आले. या घरफोडीने परिसरातील नागरिकांत भिती पसरली आहे. ​​​​​​​

 The entrepreneur burst into the bungalow, with ten pounds of gold and silver lamps | उद्योजकाचा बंगला फोडला, रोकडसह दहा तोळे सोन्याचा ऐवज लंपास

उद्योजकाचा बंगला फोडला, रोकडसह दहा तोळे सोन्याचा ऐवज लंपास

Next
ठळक मुद्दे रमणमळ्यात उद्योजकाचा बंगला फोडलारोकडसह दहा तोळे सोन्याचा ऐवज लंपास

कोल्हापूर : कसबा बावडा शासकीय धान्य गोडाऊन रमणमळा परिसरातील उद्योजकाच्या बंद बंगल्याच्या मुख दरवाजाचे कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी ७० हजार रोकड, दहा तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे पावणेचार लाखाचा ऐवज लंपास केल्याचे मंगळवारी दूपारी उघडकीस आले. या घरफोडीने परिसरातील नागरिकांत भिती पसरली आहे.

अधिक माहिती अशी, रमणमळा, शासकीय धान्य गोडाऊन परिसरात उद्योजक अरुण वसंतराव तिरोडकर (वय ७०) यांचा ओमकार दूमजली बंगला आहे. त्यांचे न्यू शाहुपूरीमध्ये वाहनांचे गॅरेज आहे. थोरला मुलगा मुंबई-वाशी येथे कुटूंबासह राहतो. तर मुलगी पुणे येथे आहे. याठिकाणी ते व पत्नी असे दोघेच राहतात.

शुक्रवारी (दि. १) तिरोकडर दाम्पत्य मुलीकडे पुण्याला राहण्यासाठी गेले. गेली तीन दिवस त्यांचा बंगला बंद होता. पत्नी मुलीजवळ राहीली, तर अरुण तिरोडकर हे सोमवारी दूपारी कोल्हापूरला परत आले. घरी आले असता मुख दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. आतमध्ये जावून पाहिले असता खाली आणि वरच्या बेडरुममधील कपाटातील व बेडच्या कप्प्यातील साहित्य विस्कटलेले दिसले.

त्यांनी पत्नीला फोनवरुन कपाटातील दागिन्यांची व पैशाची विचारपूस केली असता त्यांनी कपाटामध्ये प्लॅस्टीक पिशवीमध्ये ७० हजार रुपये ठेवले होते. तसेच दहा तोळ्याच्या आसपास दागिने होते. उर्वरीत दागिने त्या सोबत घेवून गेल्या होत्या.

घरफोडीची वर्दी मिळताच पोलीस उपनिरीक्षक रणजित पाटील सहकार्यांसमवेत घटनास्थळी आले. त्यांनी संपूर्ण घराची पाहणी केली. ठसे तज्ज्ञांकडून तपासणी केली. श्वानाद्वारे चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता ते परिसरातच घुटमळले.

चोरट्यांचे धाडस

तिरोडकर यांच्या शेजारीच पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांचा बंगला आहे. त्यांच्या कुटूंबियांना शेजारी झालेल्या घरफोडीची कल्पनाही नव्हती. याच परिसरात शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे राहतात.

हाकेच्या अंतरावर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि निवासस्थान आहे. पोलीसांचे आजूबाजूला वास्तव्य असतानाही चोरट्यांनी घरफोडीचे धाडस केले. चार महिन्यापूर्वी याच परिसरातील एका अपार्टमेंन्टमधील बंद फलॅट चोरट्यांनी फोडून लाखाचा ऐवज लंपास केला होता.
 

 

Web Title:  The entrepreneur burst into the bungalow, with ten pounds of gold and silver lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.