‘धोनी’चा मावा, नको खाऊ भावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:47 AM2019-06-22T00:47:26+5:302019-06-22T00:47:31+5:30

एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मावा, मेफेड्रोन (ड्रग्ज), अफू, चरस, गांजा, भांग अशा अमली पदार्थांची विक्री ...

'Dhoni', you do not want to eat rice! | ‘धोनी’चा मावा, नको खाऊ भावा!

‘धोनी’चा मावा, नको खाऊ भावा!

Next

एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मावा, मेफेड्रोन (ड्रग्ज), अफू, चरस, गांजा, भांग अशा अमली पदार्थांची विक्री शहरासह उपनगरांत खुलेआम सुरू आहे. शाळा, महाविद्यालयांसह शहरातील उच्चभ्रू वर्गांतील काही व्यक्तींकडून व्यसनासाठी अमली पदार्थांची मागणी होत आहे. मंगळवार पेठ परिसरातील ‘धोनीचा मावा’ शहरात प्रसिद्ध आहे. रात्रभर मावा तयार करून दिवसभरात तो किलोच्या पिशव्यांनी शहरभर विक्रीसाठी ठिकठिकाणी रवाना केला जात आहे. हा मावा तरुणपिढीचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अवैध व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उचलला असला तरी बिनदिक्कत अमली पदार्थांची विक्री शहर, उपनगरांत सुरू आहे. सकाळी कॉलेजला येणारा बहुतांश तरुणवर्ग उद्यानात अमली पदार्थांचे सेवन करत असतानाचे भयावह चित्र पाहायला मिळत आहे. हे व्यसन पालकांची डोकेदुखी झाले आहे.
राज्यात गुटखा व सुगंधी तंबाखूसारख्या अमली पदार्थ विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे; परंतु छुप्या मार्गाने आजही या पदार्थांची विक्री केली जात असल्याचे पोलीस व अमली पदार्थ पथकांच्या कारवाईवरून स्पष्ट होते. दरम्यान, कोल्हापुरात हायफाय अमली पदार्थांची मागणी वाढत आहे.
हुक्का पार्लर सध्या बंद असली तरी हुक्क्याचे साहित्य शहरात सहजपणे उपलब्ध होत आहे. मंगळवार पेठ परिसरातील ‘धोनी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीच्या नावाने सुरु असलेल्या माव्याने शहरात थैमान घातले आहे. शिवाजी पेठ परिसरात किराणा दुकानाच्या नावाखाली बादल्या भरून मावा तयार केला जात आहे. शाळा, कॉलेज परिसरात या माव्याची राजरोस विक्री होत आहे. या अमली पदार्थांची देवघेव करण्यासाठी शहरभर विक्रेत्यांचे जाळे आहे. अनेक छोट्या-मोठ्या विक्रेत्यांकडून ग्राहकांपर्यंत त्याचा पुरवठा केला जात आहे.
सांकेतिक भाषेत मागणी : अमली पदार्थांची मागणी व व्यवहार सांकेतिक भाषेत चालतात. प्रत्येक अमली पदार्थासाठी एक विशिष्ट कोड तयार करण्यात आला आहे. कोकेनसाठी ‘कोक’, गांजासाठी ‘वीड’, हशीशसाठी ‘हसत’, एमडीसाठी ‘बुक’ या सांकेतिक शब्दांचा वापर केला जात आहे. या अमली पदार्थांची गुजरात, जम्मू-काश्मीरमधून देशभरात तस्करी केली जाते.
झोप न येण्यासाठी सेवन
शहरातील उच्चभ्रूवर्गातील काही विद्यार्थी-विद्यार्थिनी अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून अशा अमली पदार्थांचे सेवन करीत आहेत. त्यांच्याकडून व्यसनासाठी अमली पदार्थांची मागणी केली जात आहे. शरीराला लागलेली ही सवय त्यांना मृत्यूच्या दाढेपर्यंत नेत आहे.

Web Title: 'Dhoni', you do not want to eat rice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.