दादा आम्ही नक्कीच जिंकू पण...कोल्हापूर पोलीस खेळाडूंची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:27 PM2017-11-16T23:27:17+5:302017-11-16T23:33:28+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत ३0 वेळा विजेतेपद पटकाविणाºया ‘कोल्हापूर’ संघाला सर्वसाधारण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

Dada we will certainly win but ... Kolhapur police players | दादा आम्ही नक्कीच जिंकू पण...कोल्हापूर पोलीस खेळाडूंची खंत

दादा आम्ही नक्कीच जिंकू पण...कोल्हापूर पोलीस खेळाडूंची खंत

Next
ठळक मुद्देसततच्या कर्तव्यामुळे सरावाला मिळेना वेळ; याकरिता कोट्यवधींचा निधी खर्चमात्र, कामाचा ताण, वरिष्ठांची शेरेबाजी, कुटुंबाला दिला जाणारा अल्पवेळ, या सर्व बाबींमधून

दीपक जाधव
कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत ३0 वेळा विजेतेपद पटकाविणाºया ‘कोल्हापूर’ संघाला सर्वसाधारण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेच्या समारोपाला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. त्यांनी याबाबत बक्षिसे कमी का मिळाली, याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांच्याकडे विचारणा केली. त्यांनाही याचे उत्तर देता आले नाही. खरे कारण पाहता सततच्या कर्तव्यामुळे पोलीस खेळाडूंना सरावाकरिता वेळच मिळत नसल्याचे पुढे आले.

पोलीस कर्मचाºयांमधील क्रीडा गुणांना वाव मिळावा म्हणून खात्यातर्फे दरवर्षी जिल्हा, परिक्षेत्रीय, तसेच राज्य व राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. याकरिता कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. हे करीत असताना पोलीस कर्मचाºयांमधील खेळाडूंना खेळापेक्षा कर्तव्यावरच अधिक वेळ खर्च करावा लागतो. त्यामुळे सरावात सातत्य नसल्याने त्याचा परिणाम स्पर्धेत होतो. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर पोलीस दलाची क्रीडा कामगिरी होय. गेल्या ४५ वर्षांत कोल्हापूर जिल्हा संघाने सुमारे ३0 वेळा विजेतेपद पटकाविले होते. मात्र, सततच्या बंदोबस्ताच्या कर्तव्यामुळे कोल्हापूर पोलीस दलातील खेळाडूंची कामगिरी खालावत चालली आहे. यंदा तर ३६५ दिवसांपैकी सुमारे ३४० दिवस बंदोबस्त आणि उरलेल्या वेळेत कुटुंबासह खेळाच्या सरावासाठी दिले गेले होते. त्यामुळे कामगिरीत घसरण झाली. खरे कारण पाहता खेळाडू म्हणून भरती झालेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना वरिष्ठ अधिकारी ‘आता खेळ बंद करून कामाला लागा’ अशी शेरेबाजी करतात. मग, सरावाला वेळ कसा द्यायचा? असा यक्ष प्रश्न पोलीस खेळाडूंसमोर आहे.

जानेवारी २०१८ मध्ये नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा होणार आहेत. इतर जिल्'ातील पोलीस खेळाडूंना तीन महिने अगोदर केवळ सरावासाठी दिले जातात. त्याप्रमाणे कोल्हापूर पोलीस दलातील खेळाडूंनाही द्यावेत, अशी मागणी होत आहे. मात्र, कामाचा ताण, वरिष्ठांची शेरेबाजी, कुटुंबाला दिला जाणारा अल्पवेळ, या सर्व बाबींमधून कोल्हापूरचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेत कामगिरी कशी करणार, हे न उलघडणारे कोडे आहे.

विशेष म्हणजे, कोल्हापूर संघाने यापूर्वी आठ वेळा राज्यस्तरीय स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले होते. याबाबत अनेक खेळाडूंनी सरावाला वेळ मिळाला तर ‘दादा आम्ही नक्कीच जिंकू आणि कोल्हापूरचे नाव देशात नव्हे, तर सातासमुद्रापार नेऊ’ असेही बोलून दाखविले.

खेळाडूंना वेळ देऊ
सरावात सातत्य नसल्याने खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतो. हे सततच्या बंदोबस्ताचा ताणामुळे होते. ही बाब पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलून खेळाडूंना सवलत देऊ असे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
 

 

Web Title: Dada we will certainly win but ... Kolhapur police players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.