कोल्हापूर येथून सकल मराठा मोर्चाला सुरुवात- शिरोली नाक्यावरच पोलिसांनी गाडीमोर्चाला रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 11:44 AM2018-11-26T11:44:05+5:302018-11-26T18:22:56+5:30

कोल्हापूर येथील दसरा चौकातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा मोर्चाच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यावेळी आरक्षण आहे आमच्या हक्काचे नाही सरकारच्या बापाचे अशा सरकारविरोधी घोषणा

The beginning of the Grade Maratha Morcha from Kolhapur. Big police force in Shiroli too | कोल्हापूर येथून सकल मराठा मोर्चाला सुरुवात- शिरोली नाक्यावरच पोलिसांनी गाडीमोर्चाला रोखले

कोल्हापूर येथून सकल मराठा मोर्चाला सुरुवात- शिरोली नाक्यावरच पोलिसांनी गाडीमोर्चाला रोखले

googlenewsNext
ठळक मुद्देशिरोली नाका येथे कडोकोट पोलीस बंदोबस्त मोर्चा अडविण्याची शक्यता

मराठा आंदोलकांना शिरोली नाक्यावरच पोलिसांनी गाडीमोर्चाला रोखले...ताब्यात घेताना पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट 
 

कोल्हापूर : कोल्हापूर येथील दसरा चौकातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा मोर्चाच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यावेळी आरक्षण आहे आमच्या हक्काचे नाही सरकारच्या बापाचे अशा सरकारविरोधी घोषणा देण्याबरोबरच पोवाडाच्या माध्यमातूनही सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली असून तो मोर्चा आता कोल्हापूर बसस्थानकापर्यंत पोहोचला आहे. पोलीस बंदोबस्तही मोठ्याप्रमाणात ठेवला असून या मोर्चाकडे संपूर्ण मराठा समाज तसेच कोल्हापूर शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरातून मुंबई कडे निघालेल्या सकल मराठा समाजाच्या मोचार्ला पोलिसांनी सोमवारी दुपारी शिरोली नाका येथे रोखल्याने तणाव निर्माण झाला. यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत शंखध्वनी केला.तसेच मुख्यमंत्री, पालकमंत्री,जिल्हाधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करून शंखध्वनी ही केला. ताब्यात घेण्यावरुन आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट झाली. यावेळी आंदोलकांनी दिलेल्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्याचबरोबर सरकारच्या दडपशाही विरोधात आज, मंगळवारपासून दसरा चौकात धरणे आंदोलन व प्राणांतिक उपोषण करण्याची घोषणा सकल मराठा समाजातर्फे करण्यात आली.


: मराठा आंदोलकांना शिरोली नाक्यावरच पोलिसांनी रोखले

: ताब्यात घेताना पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट :

: मुख्यमंत्र्यासह पालकमंत्र्यांचा निषेध

: सरकारविरोधात शंखध्वनी

:  दडपशाहीविरोधात आजपासून दसरा चौकात धरणे आंदोलनाची घोषणा 

:  कडेकोट पोलिस बंदोबस्त; तणावाचे वातावरण

दसरा चौकात सकल मराठा समाजातर्फे उद्यापासून धरणे आंदोलनाची घोषणा, सचिन तोडकर व सहकारी करणार प्राणांतिक उपोषण करणार

(व्हिडीओ पहा.. कोल्हापूर फेसबूकपेज)

 

 

 

Web Title: The beginning of the Grade Maratha Morcha from Kolhapur. Big police force in Shiroli too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.