पराभव विसरून कामाला लागा : शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:53 AM2019-07-08T00:53:18+5:302019-07-08T00:53:23+5:30

आंबा : ठेच लागली म्हणून पायाचा अंगठा कापून ठेवायचा नसतो, तर ती जखम बरी करून पुन्हा जोमाने कामाला लागायचे ...

Beat the defeat to work: Shetty | पराभव विसरून कामाला लागा : शेट्टी

पराभव विसरून कामाला लागा : शेट्टी

Next

आंबा : ठेच लागली म्हणून पायाचा अंगठा कापून ठेवायचा नसतो, तर
ती जखम बरी करून पुन्हा
जोमाने कामाला लागायचे असते. माझ्या पराभवामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास निश्चितच ढळला असेल, पण मी जर निवडणुकीच्या दु:खाला कवटाळून बसलो असतो तर देशातील शेतकरी आभाळाकडे आशाळभूत नजरेने बघत हतबल झाला असता. यामुळे पराभव विसरून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले. आंबा येथे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कार्यकर्ता अभ्यास शिबिर झाले, त्यावेळी ते बोलत होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्यावतीने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीतील आढावा तसेच निवडणुकीत पक्षाला आलेले अपयश, त्याची कारणमीमांसा व विचारमंथन, केंद्र व राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरण, त्यामुळे उद्ध्वस्त झालेली शेती व गावगाडा तसेच त्याचे परिणाम, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पक्ष, युवा आघाडीची संघटनात्मक बांधणी, आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीची भूमिका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आगामी राजकीय तसेच आंदोलनाची दिशा या विविध विषयांवरती चर्चा झाली.
यावेळी कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीतील अपयश, चळवळीची पुढील दिशा, संघटना, पक्ष, महिला आघाडी व युवा आघाडीची संघनात्मक बांधणी या विषयावर मते मांडली. या शिबिरास जिल्हाध्यक्ष भगवान काटे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रात्रीचा दिवस करा
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर मी राज्यामध्ये जवळपास दोन हजार किलोमीटरचा दुष्काळ दौरा केला. शेती क्षेत्राकडे सरकारने दुर्लक्षित केल्याने व राज्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटे वाढल्यामुळे दिवसेंदिवस आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी चळवळीच्या माध्यमातून शेतकºयांचे प्रश्न हातात घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी रात्रीचा दिवस करावा.

Web Title: Beat the defeat to work: Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.