अनुलोमतर्फे शुक्रवारी विकास मेळावा, डॉ. अविनाश पोळ, कांचनताई परूळेकर, प्रसाद देशपांडे , इंद्रजित देशमुख मार्गदर्शन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 04:55 PM2018-01-04T16:55:26+5:302018-01-04T17:00:52+5:30

अनुगामी लोकराज्य महाभियान(अनुलोम)च्या पश्चिम महाराष्ट्र विभागातर्फे उद्या, शुक्रवारी सकाळी दहा वाजता राजाराम महाविद्यालयात सामाजिक संस्थांचा विकास मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ‘अनुलोम’चे विभाग जनसेवक चंद्रकांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Anilottam's development rally on Friday, Dr. Avinash Poll, Kanchantai Parulekar, Prasad Deshpande, Indrajit Deshmukh will guide | अनुलोमतर्फे शुक्रवारी विकास मेळावा, डॉ. अविनाश पोळ, कांचनताई परूळेकर, प्रसाद देशपांडे , इंद्रजित देशमुख मार्गदर्शन करणार

अनुलोमतर्फे शुक्रवारी विकास मेळावा, डॉ. अविनाश पोळ, कांचनताई परूळेकर, प्रसाद देशपांडे , इंद्रजित देशमुख मार्गदर्शन करणार

Next
ठळक मुद्देचार जिल्'ांतील सामाजिक संस्थांचे दोन हजार प्रतिनिधी हजर राहणार सामाजिक संस्थांना कायदेविषयक व नोंदणीविषयक मार्गदर्शनअंतर्गत तपासणी व लेखापरीक्षण, ८० जी /१२ ए नोंदणी आदींबद्दल मार्गदर्शन केले जाणार

कोल्हापूर : अनुगामी लोकराज्य महाभियान(अनुलोम)च्या पश्चिम महाराष्ट्र विभागातर्फे उद्या, शुक्रवारी सकाळी दहा वाजता राजाराम महाविद्यालयात सामाजिक संस्थांचा विकास मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ‘अनुलोम’चे विभाग जनसेवक चंद्रकांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या मेळाव्याचे उद्घाटन महसूल व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार आदी उपस्थित राहणार आहेत. या विकास मेळाव्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चार जिल्'ांतील सामाजिक संस्थांचे दोन हजार प्रतिनिधी हजर राहणार आहेत.

या मेळाव्यात पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ (सातारा), ‘स्वयंसिद्धा’च्या कांचनताई परूळेकर, प्रसाद देशपांडे (आटपाडी), कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, पुणे येथील सेवावर्धिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुलकर्णी आदी मार्गदर्शन करणार आहेत.

सामाजिक संस्थांना कायदेविषयक व नोंदणीविषयक मार्गदर्शन, अंतर्गत तपासणी व लेखापरीक्षण, ८० जी /१२ ए नोंदणी आदींबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी भूपेंद्र मुजुमदार, पारस ओसवाल आदी उपस्थित होते.
 

 

Web Title: Anilottam's development rally on Friday, Dr. Avinash Poll, Kanchantai Parulekar, Prasad Deshpande, Indrajit Deshmukh will guide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.