पुलाचे काम बंद पाडणाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा पर्यायी शिवाजी पूल : नागरी कृती समिती लेखी म्हणणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:02 AM2018-02-07T01:02:11+5:302018-02-07T01:03:40+5:30

कोल्हापूर : शिवाजी पुलावर घडलेल्या बस दुर्घटनेस जबाबदार धरून पर्यायी पुलाचे काम बंद पाडणाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा,

Alternative Civil Supplies Committee: Civil action committee to write a written complaint | पुलाचे काम बंद पाडणाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा पर्यायी शिवाजी पूल : नागरी कृती समिती लेखी म्हणणे

पुलाचे काम बंद पाडणाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा पर्यायी शिवाजी पूल : नागरी कृती समिती लेखी म्हणणे

Next

कोल्हापूर : शिवाजी पुलावर घडलेल्या बस दुर्घटनेस जबाबदार धरून पर्यायी पुलाचे काम बंद पाडणाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, यासाठी मंगळवारी सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या सदस्यांनी करवीर पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्यासमोर जबाब नोंदविला.

त्याशिवाय बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. विवेक घाटगे यांनीही कृती समितीच्या बाजूने युक्तिवाद मांडला. दरम्यान, आणखी संबंधितांचे जबाब नोंदवून त्याबाबतचा अहवाल पुढील ५ दिवसांत पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना देण्यात येणार असल्याची माहिती उपअधीक्षक गुरव यांनी दिली.

शिवाजी पुलावर मिनी बस दुर्घटना घडल्यानंतर सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना निवेदन दिले होते. ज्या अधिकाºयांच्या हलगर्जीपणामुळे, तथाकथित पर्यावरणप्रेमी, तक्रारदाराने पर्यायी पुलाचे काम बंद पाडले आणि धोकादायक शिवाजी पूल नागरिकांना वापरण्यास भाग पाडले त्यातूनच २६ जानेवारीला बस दुर्घटना घडून १३ जणांचा बळी गेला. त्यामुळे संबंधितांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, असे म्हटले होते.

त्यानुसार मंगळवारी दुपारी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे, अशोक पोवार, आण्णा पोतदार, अजित सासने यांचे लेखी जबाब नोंदविले. तसेच सन २०१५मध्ये राष्टÑीय महामार्ग अभियंत्यांनी हा शिवाजी पूल धोकादायक व कालबाह्य झाल्याचे पत्र जिल्हाधिकाºयांना दिले तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच तथाकथित पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड आणि दिलीप देसाई यांच्याही तक्रारीमुळे हे काम बंद पडल्याने त्यांनाही जबाबदार धरण्यात यावे, असे जबाबात नोंदविले आहे.

पाच दिवसांत अहवाल देणार : गुरव
आणखी काही संबंधितांचे जबाब नोंदवून पुढील पाच दिवसांत याबाबतचा अहवाल तयार करून तो पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना देण्यात येणार असून, त्यानंतर मनुष्यवधाचे गुन्हे नोंदविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन करवीर पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी दिले.

शिवाजी पुलावरील बस दुर्घटनेस जबाबदार धरून पर्यायी पुलाचे काम बंद पाडणाºयांवर गुन्हा नोंदवावा यासाठी मंगळवारी सर्वपक्षीय नागरी कृती समितीच्या सदस्यांनी सूरज गुरव यांच्यासमोर जबाब नोंदवला. यावेळी अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, बाबा पार्टे, अ‍ॅड. विवेक घाटगे, आर. के. पोवार, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अशोक पोवार, आदी उपस्थित होते.
.

Web Title: Alternative Civil Supplies Committee: Civil action committee to write a written complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.