फटाके फोडण्यावरून तीन गटांत जोरदार राडा, २५ जणांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By मुरलीधर भवार | Published: January 23, 2024 05:14 PM2024-01-23T17:14:38+5:302024-01-23T17:15:08+5:30

जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Three groups clashed over bursting firecrackers, a case was registered against 25 people in Kolsevadi police station | फटाके फोडण्यावरून तीन गटांत जोरदार राडा, २५ जणांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

फटाके फोडण्यावरून तीन गटांत जोरदार राडा, २५ जणांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कल्याण-अयोध्येत प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर नागरीकांकडून जल्लोष साजरा केला गेला. मात्र कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरात फटाके फोडण्याच्या कारणावरुन वाद झाल्याने गालबोट लागले आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरात असलेल्या जानकी ग्लाबल रुग्णलयासमोर काही तरुण फटाके फोडत असताना वाद झाला. दोन गट आमने सामने आले. या गटामध्ये वाद सुरु असताना मध्यस्थी करण्यासाठी तिसरा गटही आला. या तिन्ही गटात नंतर जोरदार राडा सुरु झाला. जवळपास अर्धा पाऊण तास हा राडा सुरुच होता. या राड्या दरम्यान काही तरुण जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात पोलिसानी तीनही गटांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसानी २५ जणांना आरोपी केले आहे. पुढील तपास सुरु आहे.
 

Web Title: Three groups clashed over bursting firecrackers, a case was registered against 25 people in Kolsevadi police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.