वेगवेगळ्या रंगाने जरी रंगले असलो तरी आम्हाला एकत्र ठेवणारा रंग भगवा आहे: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विधान

By मुरलीधर भवार | Published: March 25, 2024 03:18 PM2024-03-25T15:18:38+5:302024-03-25T15:20:30+5:30

डोंबिवलीत शिवसेना शहर शाखेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी साजरी केली रंगपंचमी

saffron is the color that unites us even though we are painted in different colors said mp dr shrikant shinde | वेगवेगळ्या रंगाने जरी रंगले असलो तरी आम्हाला एकत्र ठेवणारा रंग भगवा आहे: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विधान

वेगवेगळ्या रंगाने जरी रंगले असलो तरी आम्हाला एकत्र ठेवणारा रंग भगवा आहे: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विधान

मुरलीधर भवार, डोंबिवली-रंगपंचमी निमित्त आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली शिवसेना शहर शाखेला भेट दिली. यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासोबत रंगपंचमी साजरी केली. खासदार शिंदे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिकांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगिले की, देशात ४०० पार तर महाराष्ट्रात ४५ पार या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीला सामोरे जात आहोत.
खासदार शिंदे म्हणाले की, आज आम्ही वेगवेगळ्या रंगात जरी रंगलेले असलो तरी आम्हा सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा जो रंग आहे. तो भगवा रंग आहे. हिंदुत्वाचा रंग आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा रंग आहे. त्या भगव्या रंगाला आम्ही पुढे घेऊन जाण्याचे काम करतोय असे सांगितले.

Web Title: saffron is the color that unites us even though we are painted in different colors said mp dr shrikant shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.