डोंबिवलीची जलपरी सुखजित कौरचा विश्वविक्रम

By मुरलीधर भवार | Published: March 14, 2023 05:33 PM2023-03-14T17:33:18+5:302023-03-14T17:36:44+5:30

डोंबिवली - डोंबिवलीची जलपरी म्हणून नावलौकिक मिळवलेली सुखजित कौर हिने सलग १४ तास पोहण्याचा विक्रम आपल्या नावावर कोरला आहे. ...

Dombivli mermaid Sukhjit Kaur's world record | डोंबिवलीची जलपरी सुखजित कौरचा विश्वविक्रम

डोंबिवलीची जलपरी सुखजित कौरचा विश्वविक्रम

googlenewsNext

डोंबिवली - डोंबिवलीची जलपरी म्हणून नावलौकिक मिळवलेली सुखजित कौर हिने सलग १४ तास पोहण्याचा विक्रम आपल्या नावावर कोरला आहे. १५ ऑगस्ट २०१४ ला स्मिता काटवे यांनी तयार केलेला १२ तासांचा विक्रम सुखजीतने मोडीत काढला आहे. तिने हा विक्रम कल्याणच्या न्यू वायले स्पोर्ट्स क्लबच्या तरण तलावात केला आहे.

हा विक्रम वयाच्या ४९ व्या वर्षी नोंदवत १२४६ लॅप्स (राऊंड) मारले. हा संपूर्ण प्रयत्न दोन पात्र निरीक्षकांनी पाहिला. या प्रयत्नामुळे तिचे नाव एकाच वेळी सर्वात प्रतिष्ठित इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदवले गेले. सुखजीत ही लांब पल्ल्याच्या जलतरणपटू आहे. तिने वॉटरपोलो ट्रायथलॉन आणि व्हॉलीबॉलमध्ये मुंबई विद्यापीठाकडून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या स्मिता काटवेचा ९ वर्षांचा विक्रमही मोडला.

सुखजीतला जादूच्या पुस्तकातून नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, तिचे नाव कथेसह रेकॉर्ड बुक्समध्ये प्रकाशित झाले आहे. तिला तिच्या आगामी आंतरराष्ट्रीय इव्हेंट्स, फिना मास्टर्स या स्पर्धेसाठी तिला गरज आहे इव्हेंट्ससाठी मला प्रायोजित करण्यासाठी कोणतीही कंपनी पुढे आली तर मी अनेक विक्रम करू शकेल असे तिने सांगितले. तसेच पुढेही अनेक विक्रमांना गवसणी घालायची असून यासाठी शासनाचे हवे आहे. पन्नास वर्षापर्यंत मी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच लांब पल्याच्या अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवल्यानंतरही शासनाने मला कुठलाही पुरस्कार किंवा आर्थिक मदत केली नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे.

 

Web Title: Dombivli mermaid Sukhjit Kaur's world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.